नागापूरमध्ये अँटिजन तपासणीला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:33 AM2021-04-18T04:33:15+5:302021-04-18T04:33:15+5:30

परळी : कोरोनाचे रुग्ण वाढलेल्या तालुक्यातील नागापूर येथे अँटिजन तपासणी मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला. पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या निर्देशानुसार ...

Response to antigen testing in Nagpur | नागापूरमध्ये अँटिजन तपासणीला प्रतिसाद

नागापूरमध्ये अँटिजन तपासणीला प्रतिसाद

Next

परळी : कोरोनाचे रुग्ण वाढलेल्या तालुक्यातील नागापूर येथे अँटिजन तपासणी मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला. पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या निर्देशानुसार सरपंच मोहन सोळंके, पंचायत समितीचे सभापती बालाजी मुंडे, परळी तालुका आरोग्य अधिकारी लक्ष्मण मोरे यांनी उपाययोजना करीत शनिवारी नागापूर येथे अँटिजन तपासणी शिबिराचे आयोजन केले होते.

परळी पंचायत समितीचे सभापती बालाजी मुंडे, माऊली मुंडे व सरपंच मोहन सोळंके यांनी जाऊन गावातील परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर स्वतः गावात फिरून जास्तीत जास्त नागरिकांनी अँटिजन तपासणी करून घेण्याचे आवाहन केले. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेची गंभीरता समजून सांगत जनजागृती करण्यात आली. नागरिकांनी शासकीय नियमांची कडक अंमलबजावणी करावी, तसेच मास्क, सोशल डिस्टन्सचे पालन करावे. गावात ग्रामपंचायतने जनजागृती करावी, गावातील प्रत्येक नागरकाने मास्क वापरावे, पारावर, ओट्यावर एकत्र जमू नये, गर्दी करून नये, लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करून कोरोनाचा संसर्ग रोखावा, तसेच जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन यावेळी सभापती मुंडे यांनी केले.

===Photopath===

170421\17_2_bed_20_17042021_14.jpeg~170421\17_2_bed_19_17042021_14.jpeg

===Caption===

नागापूरमध्ये ॲन्टिजन तपासणीला प्रतिसाद~नागापूरमध्ये ॲन्टिजन तपासणीला प्रतिसाद

Web Title: Response to antigen testing in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.