हंबर्डे महाविद्यालयात बँकिंग जागृती कार्यशाळेला प्रतिसाद - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:24 AM2021-07-18T04:24:05+5:302021-07-18T04:24:05+5:30

या कार्यक्रमात एसबीआय लाइफ इन्शुरन्सचे विभागीय अधिकारी गर्गे यांनी बँकेतील विविध योजनांबद्दल मार्गदर्शन केले. वृषाली शहाणे यांनी ...

Response to Banking Awareness Workshop at Humberde College - A | हंबर्डे महाविद्यालयात बँकिंग जागृती कार्यशाळेला प्रतिसाद - A

हंबर्डे महाविद्यालयात बँकिंग जागृती कार्यशाळेला प्रतिसाद - A

Next

या कार्यक्रमात एसबीआय लाइफ इन्शुरन्सचे विभागीय अधिकारी गर्गे यांनी बँकेतील विविध योजनांबद्दल मार्गदर्शन केले. वृषाली शहाणे यांनी आपल्या आयुष्यात बचत आणि गुंतवणूक कशी असली पाहिजे व कुठे गुंतवणूक केली पाहिजे यावर सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष किशोर हंबर्डे यांनी बँकिंग सेवा व बँकेतील असणाऱ्या विविध योजना, इन्शुरन्स हे कसे महत्त्वाचे आणि फायद्याचे आहेत, यावर माहिती दिली.

या कार्यक्रमात महाविद्यालयातील ग्रंथपाल सुनील मुटकुळे यांना राज्यस्तरीय आदर्श ग्रंथपाल पुरस्कार मिळाल्याबद्दल तसेच महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी माजी पोलीस निरीक्षक अरुण दाणी यांनी महाविद्यालयास पन्नास पुस्तके भेट दिल्याबद्दल त्यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

सूत्रसंचालन डॉ. सखाराम वांढरे यांनी केले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. व्ही. एल. शिंदे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सोपानराव निंबोरे, एसबीआयच्या विकास अधिकारी वृषाली शहाणे, उपप्राचार्य डॉ. बाबासाहेब मुटकुळे, प्रा. अविनाश कंदले, डॉ. सुहास गोपणे, समन्वयक प्रा. निवृत्ती नानवटे, डॉ. अभय शिंदे, कार्यालय अधीक्षक सरस्वती जाधव, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. डॉ. मंगेश शिरसाठ यांनी आभार मानले.

Web Title: Response to Banking Awareness Workshop at Humberde College - A

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.