गेवराईत रानभाजी महोत्सवाला प्रतिसाद - A - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:38 AM2021-08-17T04:38:37+5:302021-08-17T04:38:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क गेवराई : कृषी विभाग (आत्मा) आणि कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जागतिक आदिवासी दिनानिमित्त येथील तालुका कृषी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
गेवराई : कृषी विभाग (आत्मा) आणि कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जागतिक आदिवासी दिनानिमित्त येथील तालुका कृषी कार्यालयात शुक्रवारी रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यात २७ प्रकारच्या भाज्या मांडण्यात आल्या होत्या. रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन आमदार लक्ष्मण पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बी. एम. प्रतिष्ठानचे बाळासाहेब मस्के, दीपक सुरवसे, गटविकास अधिकारी अनिरुद्ध सानप, सूरज मडके, तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब सोनवणे, कृषी मंडळ अधिकारी अश्विनी मस्के, हर्षवर्धन खेडकर, राजाभाऊ आतकरे, दीपक वावरे, रवी मुंडे, कृषी विज्ञान केंद्राचे किशोर जगताप, डाॅ. तुकेश सुरपाम उपस्थित होते. यावेळी तांदुळजा, माठ, हादगा, करटोली, अंबाडी, गुळवेल, पुदिना, शेवगा, कपाळफोडी, केना, चिवळसह विविध २७ प्रकारच्या भाज्यांचे स्टाॅल लावण्यात आले होते. त्यास ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
160821\16bed_2_16082021_14.jpg
गवराई तालुका कृषी विभागाच्या वतीने रानभाजी महोत्सवाचे आयोजन केले होते. त्यास उत्स्फूर्त पतिसाद मिळाला.