गेवराईत रानभाजी महोत्सवाला प्रतिसाद - A - A - A - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:36 AM2021-08-19T04:36:21+5:302021-08-19T04:36:21+5:30

गेवराई : कृषी विभाग (आत्मा) आणि कृषी विज्ञान केंद्राच्यावतीने जागतिक आदिवासी दिनानिमित्त येथील तालुका कृषी कार्यालयात शुक्रवारी रानभाजी महोत्सवाचे ...

Response to Gevrai Ranbhaji Mahotsavala - A - A - A - A | गेवराईत रानभाजी महोत्सवाला प्रतिसाद - A - A - A - A

गेवराईत रानभाजी महोत्सवाला प्रतिसाद - A - A - A - A

Next

गेवराई : कृषी विभाग (आत्मा) आणि कृषी विज्ञान केंद्राच्यावतीने जागतिक आदिवासी दिनानिमित्त येथील तालुका कृषी कार्यालयात शुक्रवारी रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यात २७ प्रकारच्या भाज्या मांडण्यात आल्या होत्या. रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन आमदार लक्ष्मण पवार यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी बी. एम. प्रतिष्ठानचे बाळासाहेब मस्के, दीपक सुरवसे, गटविकास अधिकारी अनिरुद्ध सानप, सूरज मडके, तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब सोनवणे, कृषी मंडल अधिकारी अश्विनी मस्के, हर्षवर्धन खेडकर, राजाभाऊ आतकरे, दीपक वावरे, रवी मुंडे, कृषी विज्ञान केंद्राचे किशोर जगताप, डाॅ. तुकेश सुरपाम उपस्थित होते. यावेळी तांदुळजा, माठ, हादगा, करटोली, अंबाडी, गुळवेल, पुदिना, शेवगा, कपाळफोडी, केना, चिवळसह विविध २७ प्रकारच्या भाज्यांचे स्टाॅल लावण्यात आले होते. त्यास ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Web Title: Response to Gevrai Ranbhaji Mahotsavala - A - A - A - A

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.