श्रीपतरायवाडीत कोविड प्रतिबंधक लसीकरणाला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:38 AM2021-09-12T04:38:31+5:302021-09-12T04:38:31+5:30
लोखंडी सावरगाव : लोखंडी सावरगाव येथील आरोग्य उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या श्रीपतरायवाडी येथे कोविड प्रतिबंधक लसीकरणाला प्रतिसाद मिळाला. ग्रामपंचायतीच्या ...
लोखंडी सावरगाव : लोखंडी सावरगाव येथील आरोग्य उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या श्रीपतरायवाडी येथे कोविड प्रतिबंधक लसीकरणाला प्रतिसाद मिळाला.
ग्रामपंचायतीच्या वतीने लसीकरणासाठी वेळोवेळी जनजागृती करण्यात आली. श्रीपतरायवाडी येथे १८ वर्षांवरील ४९३ पैकी ४७१ जणांना कोविशिल्डचा पहिला डोस देण्यात आला. तर २२ जण आजारी व बाहेरगावी असल्याने लसीकरणाचे राहिले आहेत, तर यात बऱ्याच जणांचे दुसरेही लसीकरण झाले आहेत.
लसीकरणासाठी श्रीपतरायवाडी ग्रामपंचायत, अंबाजोगाई येथील खोलेश्वर प्राथमिक विद्यालय विवेक ग्राम व येथील भजनी मंडळाने जनजागृती फेरी काढली यावेळी पंचायत समिती सदस्य तानाजी देशमुख, सरपंच सूर्यकांत माने, उपसरपंच अश्विनी गणेश पवार, ग्रामसेवक अरुण लाखे, माजी सरपंच राजाभाऊ माने, व्यंकटी हंगे, आप्पाराव तारळकर सर्व ग्रामपंचायत सदस्य मुख्याध्यापक राजेसाहेब सरदेशमुख, बालासाहेब जाधव, अंगणवाडी कार्यकर्ता शोभाताई पवार, संगीता पवार, मीना माने, दत्ता जाधव, मोहन पवार, सागर माने आदींनी प्रयत्न केले. लसीकरणाला आरोग्य विभागाचे डॉ. शेख झेबोनिसा, डॉ. सोहेल, आरोग्य सहायक अशोक राऊत, आरोग्य सेवक बालाजी वाघमारे, आरोग्य सेविका एस. एन. कोलपुसे, रेखा मुंडेसह कर्मचारी उपस्थित होते.
110921\img-20210911-wa0046.jpg
श्रीपतरायवाडी येथे लसीकरणाची भजना द्वारे जनजागृती करताना