‘लोकमत रक्ताचं नातं’ शिबिरात सिरसाळ्यात प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:22 AM2021-07-19T04:22:21+5:302021-07-19T04:22:21+5:30
कोरोना, लॉकडाऊनमुळे राज्यात रक्ताचा तुटवडा आहे, तो दूर करण्यासाठी लोकमतने एक पाऊल उचलले असल्याने नागरिकांमध्ये विशेष कौतुक होत आहे. ...
कोरोना, लॉकडाऊनमुळे राज्यात रक्ताचा तुटवडा आहे, तो दूर करण्यासाठी लोकमतने एक पाऊल उचलले असल्याने नागरिकांमध्ये विशेष कौतुक होत आहे. यामुळे सिरसाळासह परिसरातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सदस्या कल्पना आघाव, सिरसाळा पत्रकार संघाचे अध्यक्ष जावेद पठाण यांच्यासह अनेक युवक, युवतींनी रक्ताचं नातं या शिबिरात सहभाग घेतला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य बालासाहेब किरवले, सरपंच प्रतिनिधी राम किरवले, मुन्ना काळे, अनिल जाधव, सदाशिव देशपांडे, कुंडलिक लहाने, रफिक पठाण, मिलिंद चोपडे, धर्मा मेंढके, बाबासाहेब काळे, आकाश कांबळे, तुकाराम आचार्य, रमेश लहाने, अनिल देशमुख, बालाजी काळे, आदींची उपस्थिती होती. दरम्यान, दवाखान्याचा वतीने आरोग्य सेवक, राधाकिशन राऊत, संदीप लांडगे, केशव पाटील, आफताब सय्यद, हनुमान पवार, राजेश जगदीश आदींनी सहकार्य केले.
180721\18bed_14_18072021_14.jpg
‘लोकमत रक्ताच नात’ शिबिरात सिरसाळ्यात प्रतिसाद मिळाला.