अंबाजोगाई तालुक्यातील २ मतदान केंद्राची संपूर्ण जबाबदारी आहे महिला कर्मचा-यांच्या हाती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 01:33 PM2017-10-07T13:33:55+5:302017-10-07T13:35:40+5:30
मगरवाडी आणि दस्तगीरवाडी या अंबाजोगाई तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत मध्ये आज मतदान सुरु आहे. विशेषबाब म्हणजे या दोन्ही मतदान केंद्राची संपूर्ण जबाबदारी महिला कर्मचारी पार पाडत आहेत.
अंबाजोगाई (बीड), दि. ७ : मगरवाडी आणि दस्तगीरवाडी या अंबाजोगाई तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत मध्ये आज मतदान सुरु आहे. विशेषबाब म्हणजे या दोन्ही मतदान केंद्राची संपूर्ण जबाबदारी महिला कर्मचारी पार पाडत आहेत.
मगरवाडी येथील बुथ क्रमांक १/२८७ आणि बुथ क्रमांक २/ २८७ या दोन्ही मतदान केंद्रावर मतदान अधिकारी यांच्या पासून ते सुरक्षा कर्मचारी यांच्या पर्यंत सर्व महिला कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. मगरवाडी हे गाव अंबाजोगाई शहरापासून ५-६ किमी अंतरावर आहे. गावातील मतदान केंद्र क्रमांक १/२८७ वर निवडणुक निर्णय अधिकारी (PRO) म्हणून यु. एल. रामधामी या काम पहात असून त्यांच्यासोबत एम. एम. तोडकर, ए.ए. लोसरवार, एम.आर. गुळभिले, एस. ए. गालफाडे या काम पाहत आहेत. तसेच मतदान केंद्र क्रमांक २/२८७ वर निवडणुक निर्णय अधिकारी (PRO) म्हणून एस. एस. सुलाखे या काम पहात असून त्याच्यासोबत आर. एम. चवरे, एस .व्ही. देशमुख, एस. जे. सुर्यवंशी, डी. एम. काठी, एस. ए. गालफाडे या काम पाहत आहेत. दोन्ही केंद्रावर सुरक्षा कर्मचारी म्हणून एस. एस. बडे व ए. डी. बदने या कार्यरत आहेत.
या दोन्ही मतदान केंद्रावर निवडणुक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी शिवकुमार स्वामी, सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार संतोष रुईकर, निवडणुक विभागाचे नायब तहसीलदार शंकर बुरांडे, महसुल विभागाच्या नायब तहसीलदार स्मिता बाहेती यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली व सर्वांचे स्वागत केले. यासोबतच मंडळ निरीक्षक एन. आय. शेख, तलाठी डी. डी. साळुंखे व निवडणूक विभागातील सर्व कर्मचारी मतदान सुरळीत पार पाडण्यासाठी प्रयत्न करत आहेत.