सेवानिवृत्तीचा काळ समाजसेवेला अर्पण करावा - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:31 AM2021-03-25T04:31:20+5:302021-03-25T04:31:20+5:30
सामाजिक कार्याची जाण ठेवून सेवानिवृत्त बहुजन अधिकारी - कर्मचारी महासंघ, बीडच्या वतीने महामानव सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ...
सामाजिक कार्याची जाण ठेवून सेवानिवृत्त बहुजन अधिकारी - कर्मचारी महासंघ, बीडच्या वतीने महामानव सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी वंचित बहुजन आघाडी, बीडचे जिल्हा अध्यक्ष प्रा. शिवराज बांगर, भा. बौ. महासभा जिल्हाध्यक्ष विष्णू कांबळे, प्रशांत वासनिक, नाना डोंगरे, ब. अ. क. महासंघ जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण हिरे, प्रा. राजेंद्र कोरडे, प्रा. सर्जेराव मस्के, बाबासाहेब वाघमारे, अर्जुन जौंजाळ, किरण वाघमारे, बाबा मोरे, बाळासाहेब वाघमारे व कार्याध्यक्ष सखाराम उजगरे यांची उपस्थिती होती.
त्याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. सेवारत कार्यकाळातील अनुभवाच्या जोरावर निवृत्तीनंतर आपले आवडते क्षेत्र निवडून सामाजिक सेवा कशी करता येईल, असा प्रत्येक सेवानिवृत्त बहुजन अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रयत्न असला पाहिजे. येथून पुढेदेखील सामाजिक कार्य सतत चालू ठेवण्याचे ठोस आश्वासन जिल्हा कार्यकारिणीचे सचिव जी. एम. भोले व पदाधिकाऱ्यांनी दिले.
कार्यक्रमाला बाळासाहेब शिंदे, डी. डी.गवळी, पी. बी. विद्यागर, भास्कर सरपते, इंजि. वसंत तरकसे, डी. जी. वानखेडे, प्रा. अशोक गायकवाड, धर्मराज मजमुले, उमाजी वाघमारे, आर. डी. चक्रे, चव्हाण पंडित, हिरामण धन्वे, दळवी बळीराम, सुधाकर विद्यागर, आशाताई विद्यागर व जिल्हा कार्यकारिणीचे सर्व सभासद उपस्थित होते.