चोरीच्या गुन्ह्यातील अडीच लाखांचा मुद्देमाल फिर्यादींना परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 12:16 AM2018-09-30T00:16:06+5:302018-09-30T00:16:28+5:30
चोरीच्या गुन्ह्यात तपास करून पोलिसांनी हस्तगत केलेला ३ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल शनिवारी ११ फिर्यादी तसेच मुळ मालकांना सार्वजनिक कार्यक्रमात सनमानपूर्वक सुपुर्द करण्यात आला. येथील पोलीस उपअधीक्षक कार्यालयात हा कार्यक्रम घेण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : चोरीच्या गुन्ह्यात तपास करून पोलिसांनी हस्तगत केलेला ३ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल शनिवारी ११ फिर्यादी तसेच मुळ मालकांना सार्वजनिक कार्यक्रमात सनमानपूर्वक सुपुर्द करण्यात आला. येथील पोलीस उपअधीक्षक कार्यालयात हा कार्यक्रम घेण्यात आला.
एक जबरी चोरी, एक घरफोडी आणि चोरीचे चार अशा सहा गुन्ह्यातील सोने, चांदीचे दागिने, नगदी रक्कम, शालेय कागदपत्रे तसेच परळी शहर, माजलगाव शहर आणि दिंद्रुड पोलीस ठाणेअंतर्गत दाखल पाच अशा ११ गुन्ह्यातील एकुण २ लाख ३४ हजार रूपयांचा मौल्यवान मुद्देमाल या सार्वजनिक कार्यक्रमात फिर्यादी, मूळ मालकांना पोलीस उपअधीक्षक भास्कर सावंत यांच्या हस्ते सन्मानपूर्वक परत करण्यात आला. पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांची संकल्पना व मार्गदर्शनातून तसेच सततच्या पाठपुराव्यामुळे हा कार्यक्रम होत असल्याचे उपअधीक्षक (गृह) भास्कर सावंत यांनी सांगितले. या कार्यक्रमास स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागाचे पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे, मोहरील रामदासी, जाधव, येवले, यादव यांच्यासह फिर्यादी संतोष पांचाळ, नितीन घोडके, विजय सुरवसे, कांताराव सुरवसे, नदीम कुरेशी, प्रमोद डोंगरे आदी उपस्थित होते.
गुन्हा घडल्यापासून ते गुन्ह्यातील सोन्याचे दागिने परत मिळेपर्यंत पोलिसांकडून सन्मानपूर्वक वागणूक मिळाल्याचे फिर्यादी नितीन घोडके रा. गेवराई यांनी सांगितले.
पाटोदा येथील माजी सैनिक काताराव सुरवसे यांनी शिवशही बसमधून प्रवासादरम्यान मुलगा विजय याच्या ताब्यातील शैक्षणिक कागदपत्रांसह फिससाठीची रक्कम असलेली बॅग चोरट्यांनी लंबास केली होती.
ही माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार नाईक, पोलीस निरीक्षक माने व स्टाफने जलदगतीने मोहीम राबविल्याने लष्करातील सर्जिकल स्ट्राइकची आठवण झाल्याचे सांगितले. मुलाच्या श्ैक्षणिक कागदपत्रांसह १५ हजार रुपये जशास तसे परत हस्तगत करून पोलिसांनी सन्मानपूर्वक दिल्याचे सांगून उपअधीक्षक भास्कर सावंत यांचा माजी सैनिक संघयनेच्या वतीने सत्कार केला.