पैशासाठी पत्नीची निर्घृण हत्या केल्याचे उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 11:59 PM2019-11-26T23:59:41+5:302019-11-27T00:00:06+5:30

परळी तालुक्यातील सिरसाळा येथे सोमवारी पतीने केलेल्या पत्नीच्या खुनाचा उलगडा झाला आहे.

Revealed murder of his wife for money | पैशासाठी पत्नीची निर्घृण हत्या केल्याचे उघड

पैशासाठी पत्नीची निर्घृण हत्या केल्याचे उघड

Next
ठळक मुद्देसिरसाळा खून प्रकरण : पतीसह तिघांना ३० पर्यंत पोलीस कोठडी

सिरसाळा : परळी तालुक्यातील सिरसाळा येथे सोमवारी पतीने केलेल्या पत्नीच्या खुनाचा उलगडा झाला आहे. म्हैस घेण्यासाठी ५० हजार व वीटभट्टी टाकण्यासाठी १ लाख रुपये माहेरहून घेऊन ये, असे म्हणत मारहाण करत जिवंत मारल्याची फिर्याद मयत महिलेच्या वडिलांनी दिल्यानंतर पतीसह तिघा जणांविरुद्ध सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पाथरी येथील शेख शगीर यांची मुलगी नेहा (वय २५ ) हिचा सिरसाळा येथील सिराज आयुबखा पठाण याच्याशी पाच वर्षापूर्वी विवाह झाला होता. लग्नानंतर सुरुवातीस तिला चांगले नांदवले. नंतर माहेरहून पैसे घेऊन ये असे म्हणत तिचा नेहमी शारीरिक व मानसिक छळ सुरू होता. काही दिवसांपूर्वी सिराजने वीटभट्टी व्यवसाय व म्हैस घेण्यासाठी असे दीड लाख रुपये वडिलांकडून घेऊन ये म्हणत वाद घालून नेहाला मारहाण सुरु केली होती. सोमवारी दोघांतील वाद एवढा विकोपाला गेला. सिराज याने पत्नी नेहाचा गळा आवळून, डोळा व ओठ फोडून हत्या केली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तात्काळ पती व इतर तिघांना अटक केली होती.
मयत नेहा हिचे वडील शेख शगीर शेख जमाल यांच्या फिर्यादीवरून मंगळवारी पहाटे सिराज आयुबखा पठाण याच्या सह सालायसीन अयुब पठाण, शाहरुख पठाण, मेहराज पठाण यांच्या विरुद्ध सिरसाळा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सपोउनि जनकराव पुरी हे करत आहेत.
पाथरी येथे माहेरी झाला दफनविधी
नेहाच्या मृतदेहाचे अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मंगळवारी सकाळी पाथरी (जि.परभणी) या तिच्या माहेरच्या गावी शोकाकुल वातावरणात दफनविधी करण्यात आला.
४ दिवसांची पोलीस कोठडी
खुनातील आरोपींना मंगळवारी दुपारी ४ वाजता परळी प्रथमवर्ग न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने चौघांना ३० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Web Title: Revealed murder of his wife for money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.