स्मशानभूमीच्या वादामुळे अंत्यविधीसाठी महसूल व पोलीस प्रशासनाचा बंदोबस्त 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 05:57 PM2018-07-14T17:57:05+5:302018-07-14T17:58:54+5:30

तालुक्यातील तांबवा येथे स्मशानभूमीच्या वादामुळे तणाव निर्माण झाला होता.

Revenue and Police Administration provide protection for funeral due to cremation ground dispute | स्मशानभूमीच्या वादामुळे अंत्यविधीसाठी महसूल व पोलीस प्रशासनाचा बंदोबस्त 

स्मशानभूमीच्या वादामुळे अंत्यविधीसाठी महसूल व पोलीस प्रशासनाचा बंदोबस्त 

Next

केज (बीड ) : तालुक्यातील तांबवा येथे स्मशानभूमीच्या वादामुळे तणाव निर्माण झाला होता. यामुळे एका वृद्धावरील अंत्यविधीसाठी महसुल व पोलीस प्रशासानाला गावात ठाण मांडावे लागल्याची घटना आज सकाळी घडली. 

तांबवा येथे ११ जुलैला नारायण चिगुरे यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या अंत्यविधी वेळेस गावातील दोन समाजातील स्मशानभूमीचा वाद उफाळून आला होता. यामुळे गावात तणाव होता. शुक्रवारी सायंकाळी नामदेव एकनाथ कोल्हे (९०) यांचे निधन झाले. त्यांच्या अंत्यविधी वेळेस काही तणाव निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनाने आज काळजी घेतली. पोलीस व महसूल पथकाच्या बंदोबस्तात त्यांच्यावर आज सकाळी अंत्यविधी पार पडले. 

Web Title: Revenue and Police Administration provide protection for funeral due to cremation ground dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.