अतिवृष्टी गावांत महसूल, कृषी विभागाकडून पंचनामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:22 AM2021-07-19T04:22:12+5:302021-07-19T04:22:12+5:30
अतिवृष्टीबाबत आमदार नमिता मुंदडा यांनी स्थानिक प्रशासनासह मुख्यमंत्र्यांना कळविले होते. याचाच परिणाम म्हणून रविवारपासून पाटोदा म. मंडळाचे तलाठी एस.जी. ...
अतिवृष्टीबाबत आमदार नमिता मुंदडा यांनी स्थानिक प्रशासनासह मुख्यमंत्र्यांना कळविले होते. याचाच परिणाम म्हणून रविवारपासून पाटोदा म. मंडळाचे तलाठी एस.जी. हिबाने, मंडळ अधिकारी एस. केंद्रे व कृषी सहायक ए.जी. गाडे यांनी ममदापूर, नांदडी, पाटोदा गावातील प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पंचनामे केले, तसेच यावेळी शेतकऱ्यांनी योग्य पंचनामे करून शासनामार्फत मदत मिळवून देण्याची मागणी केली.
अपेक्षेपेक्षा जादा पाऊस
शासकीय आकडेवारीनुसार आजच्या तारखेपर्यंत पाटोदा म. महसूल मंडळात २०९ मि.मी. पाऊस होणे अपेक्षित असताना यावर्षी ६६९ मि.मी.ची नोंद झाली आहे, असे कृषी सहायक गाडे यांनी सांगितले.
पावसात आले तहसीलदार
दुपारी ४ वाजता तहसीलदार विपीन पाटील यांनी भरपावसात येऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला व आम्ही पंचनामे करून घेतले आहेत. तुम्हीही विमा कंपनीला जास्तीत जास्त तक्रारी दाखल करा व विमा कंपनीशी संपर्कात राहा, असे यावेळी सांगितले.
180721\pho_14.jpg