कोविडसंदर्भात प्रकाश सोळंकेंनी घेतली आढावा बैठक; अधिकारी, कर्मचाऱ्यांना धरले धारेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:25 AM2021-05-28T04:25:29+5:302021-05-28T04:25:29+5:30

येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात गुरुवार रोजी झालेल्या आढावा बैठकीला आमदार प्रकाश सोळंके यांच्यासह बीड जिल्हा परिषदेचे सभापती जयसिंग ...

Review meeting held by Prakash Solanke regarding Kovid; Officers, employees caught on edge | कोविडसंदर्भात प्रकाश सोळंकेंनी घेतली आढावा बैठक; अधिकारी, कर्मचाऱ्यांना धरले धारेवर

कोविडसंदर्भात प्रकाश सोळंकेंनी घेतली आढावा बैठक; अधिकारी, कर्मचाऱ्यांना धरले धारेवर

Next

येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात गुरुवार रोजी झालेल्या आढावा बैठकीला आमदार प्रकाश सोळंके यांच्यासह बीड जिल्हा परिषदेचे सभापती जयसिंग सोळंके, समाजकल्याण सभापती कल्याण आबूज, पंचायत समिती सभापती भागवतराव खुळे, पंचायत समिती सदस्य शशांक सोळंके, जयदत्त नरवडे, नगरसेवक भागवतराव भोसले, उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे, वैद्यकीय अधीक्षक डाॅ. सुरेश साबळे, तालुका अधिकारी डाॅ. मधुकर घुबडे, गटविकास अधिकारी प्रज्ञा माने आणि कर्मचारी, आदी उपस्थित होते.

आमदार सोळंके म्हणाले, कोरोनाकाळात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रुग्णांच्या हितासाठी प्रयत्न करावेत. शासकीय रुग्णालयातील उपचार पद्धती आणि सेवा याचे कौतुक करतानाच खासगी रुग्णालयांनी कोविडबाबत दर्जेदार सेवा पुरविण्याची गरज आहे. काही खासगी रुग्णालये भरमसाट बिले आकारत असल्याचेही निदर्शनास आल्याचे सोळंके म्हणाले. खाजगी रुग्णालयातील बिलांचे ऑडिट होणे गरजेचे आहे. याबाबत संबंधितांना निर्देश देण्यात आले. संजय गांधी, श्रावणबाळ निराधार योजनेंतर्गत मिळणारे मानधन वेळेवर लाभार्थ्यांना मिळत नाही. काही ठिकाणी बँकेत रक्कम वर्ग झाल्यानंतर बँक कर्मचारी उदासीनपणा दाखवून अडथळा आणत आहेत, याबाबतही संबंधितांना धारेवर धरत या योजनेमध्ये सुसूत्रता आणण्याची गरज असल्याचे सोळंके म्हणाले.

===Photopath===

270521\purusttam karva_img-20210527-wa0057_14.jpg

Web Title: Review meeting held by Prakash Solanke regarding Kovid; Officers, employees caught on edge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.