निवडणूक अनुषंगाने एसपींची आढावा बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 00:36 IST2019-09-17T00:35:55+5:302019-09-17T00:36:10+5:30
येणाऱ्या विधासभेच्या निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असून, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी सर्व प्रमुख अधिकाऱ्यांची सोमवारी कार्यालयात बैठक घेतली व सूचना केल्या.

निवडणूक अनुषंगाने एसपींची आढावा बैठक
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : सण - उत्सव शांतते पार पडल्यानंतर सर्वांनाच विधासभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. पोलीस प्रशासनाने केलेल्या योग्य नियोजनामुळे गणेशोत्सव तसेच इतर सण शांततामय वातावरणात पार पडले. येणाऱ्या विधासभेच्या निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असून, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी सर्व प्रमुख अधिकाऱ्यांची सोमवारी कार्यालयात बैठक घेतली व सूचना केल्या.
या बैठकीला बीडचे अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, अंबाजोगाई विभगाच्या अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर व इतर सर्व पोलीस उपाधीक्षक व इतर अधिका-याची उपस्थिती होती. दरम्यान यावेळी पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी केलेल्या नियोजनाचा आढावा घेतला. त्यानंतर विधानसभानिवडणूक कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात याविषयी अधिका-यांना सूचना केल्या. दरम्यान विविध गुन्ह्यातील फरार आरोपींना पकडणे, तसेच सुरक्षेच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक कारवाया करणे, अवैध धंदेवाल्यांना चाप लावणे, एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाया करुन गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर कारवाई करणे. यासह विविध विषयांवर पोद्दार यांनी सूचना केल्या.