सुनील केंद्रेकरांनी घेतला विविध कामांचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 12:01 AM2019-07-13T00:01:01+5:302019-07-13T00:02:00+5:30
विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी शनिवारी अचानक भेट देत जिल्ह्यातील विविध कामांची पाहणी दिली. यावेळी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी वाळू चोरी रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजना व टँकरला बसवलेली जीपीआरएस सिस्टिम याविषयी माहिती दिली.
बीड : विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी शनिवारी अचानक भेट देत जिल्ह्यातील विविध कामांची पाहणी दिली. यावेळी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी वाळू चोरी रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजना व टँकरला बसवलेली जीपीआरएस सिस्टिम याविषयी माहिती दिली. या तंत्रज्ञानामुळे टँकर व वाळूमध्ये होणारा गैरप्रकार थांबण्यास मदत झाल्याचे देखील यावेळी पाण्डेय म्हणाले.
यावेळी रोजगार हमी योजना मंत्री जयदत्त क्षीरसागर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, विभागीय वन अधिकारी अमोल सातपुते, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र परळीकर, शिक्षण अधिकारी भगवानराव सोनवणे, जिल्हा गौणखनिज अधिकारी आनंद पाटील, तालुका कृषी अधिकारी दिलीप जाधव, अमोल मुंडे यांच्यासह इतर संबंधीत विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांचा दौरा नियोजित नव्हता, त्यांनी अचानक शनिवारी दुपारी बीड जिल्हाधिकारी कार्यालयात भेट दिली. त्यानंतर शहराच्या जवळील तळेगाव याठिकाणी जाऊन पाणी फाऊंडेशनच्या कामाची पाहणी केली. त्याठिकाणी काही शेतकऱ्यांशी संवाद देखील साधला, नवगण राजूरी येथील जि.प.च्या शाळेला भेट देऊन पाहणी केली. व शाळेची स्थिती पाहून शिक्षकांचे कौतुक केले. तसेच शाळेत ग्रंथालय व प्रयोगशाळा असणे गरजेचे त्याची पुर्तता करण्याचे आदेश संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. त्यानंतर केंद्रेकरांनी पालवन परिसरात भेट देऊन कमी पावसावर झालेल्या पेरण्यांची व कापूस लागड याची पाहणी केली यावेळी शेतकºयांशी संवाद साधून पिकपेरणीच्या संदर्भातील परिस्थिती जाणून घेतली.
वाळू चोरी व अवैध वाहतूक रोखण्यासाठी तसेच टँकरच्या संदर्भातील तक्रार निवारण करण्यासाठी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सर्व टँकर व वाहनांवर जीपीएस बसवण्याच्या तसेच तक्रार निवार केंद्र सुरु केले आहे. या उपक्रमाचे आयुक्त केंद्रेकर यांनी स्वागत केले. वॉररुमची पाहणी करुन टँकर व वाळू वाहतूक करणाºया टिप्पची जीपीएस स्क्रिनवर पाहणी केली.
पालवणच्या डोंगररांगावर वृक्षारोपण
विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी तळेगाव, नवगण राजुरी येथे वृक्ष लागवड केली. तसेच वन विभागाच्या तवीने मोठ्या प्रमाणात वृक्षोरोपण कार्यक्रम ज्या ठिकाणी राबवण्यात आला आहे. त्या ठिकाणी पालवणच्या डोंगररांगवर केलेले वृक्ष लगवड पाहून वन विभागाचा कामाचा आढावा घेतला, तसेच मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्याच्या सूचना दिल्या, तसेच केंद्रेकर यांच्या हस्ते वृक्षारोपण झाले.