कोरोनाबाधित रूग्ण शोधल्यास आशाताईला १०० रूपये बक्षिस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:35 AM2021-05-18T04:35:20+5:302021-05-18T04:35:20+5:30
बीड : ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. परंतू काही लोक लक्षणे असतानाही चाचणी करत नाहीत. हाच धागा पकडून ...
बीड : ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. परंतू काही लोक लक्षणे असतानाही चाचणी करत नाहीत. हाच धागा पकडून गावागावांत सर्वेक्षण करून संशयितांची चाचणी करायची. यात कोरोनाबाधित रूग्ण निष्पन्न केल्यास आशाताईंना प्रत्येक रूग्णामागे १०० रूपये बक्षिस दिले जाणार आहे. आरोग्य विभागोन याबाबत सोमवारी आदेश काढले आहेत.
सध्या जिल्ह्यात नव्या बाधित रूग्णांची संख्या स्थिर असली तर मृत्यू थांबत नसल्याचे दिसत आहे. यापूर्वीच आरोग्य विभागाने 'माझे कुटूंब माझी जबाबदारी' व 'मिशन झिरो डेथ' राबविले आहे. यात घरोघरी जावून कोमॉर्बिड आजार असलेल्यांची माहिती घेऊन त्यांच्यावर उपचार करण्यात आले. असे असले तरी आजही काही लोक पुढे येत नसल्याचे दिसते. हाच धागा पकडून आता आणखी आशाताईंना आपल्या गावात सर्वेक्षण करण्यास सुचना केल्या आहेत. यात कोरोना संशयितांची चाचणी करून तो बाधित आढळल्यास आशाताईंना १०० रूपये मोबदला दिला जाणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी सोमवारी सर्व तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांना याबाबत सुचना केल्या आहेत.
दरम्यान, प्रत्येक गावात आरोग्य केंद्राचे फिरते पथक असणार आहे. यात आरोग्य सेवक, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी यांचा समावेश असणार आहे. तसेच रूग्ण आढळल्यावर त्याच्या लक्षणांनुसार त्याला कोवीड सेंटरमध्ये दाखल केले जाणार आहे. ही सर्व जबाबदारी वैद्यकीय अधिकारी आणि तालुका आरोग्य अधिकाऱ्यांवर सोपविली आहे. प्रत्येक महिन्याला याचा आढावा घेतला जाणार असल्याचे सांगण्यात आले.
...
यापूर्वी सर्वेक्षण करून कोमॉर्बीड रूग्ण शोधले आहेत. तरीही काही लोक लक्षणे असतानाही चाचणी न करताा अंगावर दुखणे काढतात. हाच धागा पकडून पुन्हा एकदा गावपातळीवर सर्वेक्षण करण्यास सांगितले आहे. यात एखादा रूग्ण कोरोनाबाधित आढळताच संबंधित आशा स्वयंसेविकेला १०० रूपये मोबदला दिला जाणार आहे.
-डॉ.आर.बी.पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड.