जनतेच्या अधिकारांचे न्यायालयाच्या माध्यमातून जतन व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:34 AM2021-05-09T04:34:55+5:302021-05-09T04:34:55+5:30

: अंबाजोगाईत न्यायालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन अंबाजोगाई : अंबाजोगाईच्या वैभवात भर टाकणाऱ्या इमारतीचे उद्घाटन करताना आनंद होत आहे. ...

The rights of the people should be protected through the courts | जनतेच्या अधिकारांचे न्यायालयाच्या माध्यमातून जतन व्हावे

जनतेच्या अधिकारांचे न्यायालयाच्या माध्यमातून जतन व्हावे

Next

: अंबाजोगाईत न्यायालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन

अंबाजोगाई : अंबाजोगाईच्या वैभवात भर टाकणाऱ्या इमारतीचे उद्घाटन करताना आनंद होत आहे. या न्यायालयाच्या माध्यमातून निकाल देत असताना सर्वसामान्यांच्या अपेक्षा, कायदेशीर बाबींचा ऊहापोह, राज्यघटनेने व इतर कायद्यांनी जनतेला दिलेल्या अधिकारांचे जतन व्हावे आणि न्यायदान लवकर व्हावे, अशी अपेक्षा असल्याचे प्रतिपादन उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील न्यायमूर्ती तथा बीड जिल्ह्याच्या पालक न्या. विभा कंकणवाडी यांनी व्यक्त केले. अंबाजोगाई येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.

बहुप्रतिक्षित असलेल्या अंबाजोगाई येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नवीन प्रशस्त आणि सुसज्ज इमारतीचे ऑनलाईन उद्घाटन शुक्रवारी न्या. कंकणवाडी यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बीड जिल्ह्याचे प्रमुख न्या. हेमंत महाजन, तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र व गोवा वकील परिषदेचे सदस्य अ‍ॅड. वसंतराव साळुंके, न्या. वा. ज. दैठणकर, अंबाजोगाई वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. शरद लोमटे, सदस्य अ‍ॅड. पद्मा कुपकर हे उपस्थित होते.

यावेळी न्या. कंकणवाडी म्हणाल्या, कोरोना प्रादुर्भावामुळे प्रत्यक्ष हजर राहू शकले नसले तरी परिस्थिती निवळल्यास मी अंबाजोगाई न्यायालयास अवश्य भेट देईन आणि संपूर्ण पाहणी करून वकिलांच्या सर्व मागण्यांबाबत निर्णय घेईन. प्रास्ताविक न्या. हेमंत महाजन यांनी केले. अ‍ॅड. शरद लोमटे यांनी वकील सदस्यांच्या अनेक मागण्या पालक, न्यायमूर्ती, प्रमुख जिल्हा न्यायाधीश व वकील परिषद सदस्य यांच्यासमोर मांडल्या. या सर्व मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन मान्यवरांनी दिले. तसेच, यावेळी पालकमंत्री धनंजय मुंडे यांचा संदेश अ‍ॅड. शरद लोमटे यांनी वाचून दाखविला. पालकमंत्र्यांनी नूतन इमारतीच्या उद्घाटनानिमित्त सर्व न्यायमूर्ती, विधिज्ञ यांना शुभेच्छा दिल्या व यापुढेही राज्य सरकारच्या वतीने न्यायालयास आवश्यक तिथे निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन संदेशाद्वारे दिले. या कार्यक्रमास अंबाजोगाई न्यायालयातील न्यायाधीश, मोजके वरिष्ठ वकील, न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते. यावेळी अंबाजोगाई शहर आणि न्यायालयाच्या इतिहासाची चित्रफीत दाखविण्यात आली. याप्रसंगी अ‍ॅड. शरद लोमटे यांनी वकील संघास संगणक भेट दिल्याचे जाहीर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन न्या. जे. एस. भाटिया यांनी केले, तर न्या. इ. के. चौगले यांनी आभार मानले.

===Photopath===

080521\avinash mudegaonkar_img-20210508-wa0067_14.jpg

Web Title: The rights of the people should be protected through the courts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.