वाळू चोरट्यांचा उच्छाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:15 AM2021-05-04T04:15:05+5:302021-05-04T04:15:05+5:30
बीड : तालुक्यातील नेकनूर परिसरातील सात्रा पोत्रा, चांदेगाव या नदीपात्रात वाळू तस्करांनी उच्छाद मांडला आहे. प्रशासनाकडून होणारी कारवाई टाळण्यासाठी ...
बीड : तालुक्यातील नेकनूर परिसरातील सात्रा पोत्रा, चांदेगाव या नदीपात्रात वाळू तस्करांनी उच्छाद मांडला आहे. प्रशासनाकडून होणारी कारवाई टाळण्यासाठी रात्रीच्या वेळी वाळूचा उपसा करून टिप्परने व ट्रॅक्टरने वाहतूक केली जात आहे.
मोंढा रस्त्यावरील खड्डे बुजवा
बीड : शहरातील जालना रोडवरून मसरत नगरमार्गे जाणाऱ्या मोंढा रस्त्यावर खड्डे पडले आहेत. अनेक दिवसांपासून खड्डे बुजविण्याची मागणी होत आहे, परंतु अद्यापही या कामांना मुहूर्त लागलेला नाही. खड्डे बुजविण्याची मागणी आहे.
भुरट्या चोऱ्यांत वाढ
केज : शहरात गेल्या आठवड्यापासून भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. घरातील किंवा अंगणातील वस्तू चोरीला गेल्यानंतर किरकोळ बाब म्हणून तक्रार करण्याकडे नागरिक दुर्लक्ष करतात, परंतु भुरट्या चोऱ्यांना मात्र ते वैतागले आहेत. शहरात गस्त वाढविण्याची मागणी होत आहे.
गुटखा, दारू विक्री
माजलगाव : टाकरवण परिसरात सध्या अवैध दारू विक्री सर्रासपणे सुरू आहे. गुटखा बंदी असूनही गावात गुटखा विक्री सर्रास सुरू आहे, तसेच अवैध दारू विक्रीही बोकाळली आहे. दारूच्या व्यसनाने अनेकांचे संसारात कलह वाढत चालले आहेत.
वीटभट्ट्यांचे प्रदूषण
बीड : शहराच्या मोंढा रोड, जालना रोड, तेलगाव रोड, पांगर बावडी परिसरात वीटभट्ट्या आहेत. परवानगी नसतानाही अनेक भट्ट्या सुरू आहेत. प्रदूषण निर्माण करणाऱ्या या वीटभट्ट्यांवर कारवाईची मागणी नागरिकांतून होत आहे.