भाव वाढल्याने सोयाबीनचा पेरा वाढला, ‘मिली बग’ने स्वप्नांचा चुराडा केला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:40 AM2021-09-09T04:40:47+5:302021-09-09T04:40:47+5:30

बीड : जिल्ह्यात कापूस क्षेत्रात घट होऊन सोयाबीनचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मागील काही वर्षांत सोयाबीनच्या दरात वाढ ...

Rising prices led to soybean sowing, the 'Millie Bug' shattered dreams | भाव वाढल्याने सोयाबीनचा पेरा वाढला, ‘मिली बग’ने स्वप्नांचा चुराडा केला

भाव वाढल्याने सोयाबीनचा पेरा वाढला, ‘मिली बग’ने स्वप्नांचा चुराडा केला

Next

बीड : जिल्ह्यात कापूस क्षेत्रात घट होऊन सोयाबीनचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मागील काही वर्षांत सोयाबीनच्या दरात वाढ झालेली आहे. मात्र, ‘मिली बग’सारख्या कीड रोगामुळे सोयाबीनचे उत्पन्न हेक्टरी कमी होण्याची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडण्याचा अंदाज कृषी तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.

२०१७ ते २०२१ या खरीप हंगामात जिल्ह्यातील सोयाबीनचे पेरा क्षेत्र वाढले आहे. दरवर्षी वाढत असलेला सोयाबीनचा भाव व कापूस पिकापेक्षा कमी कष्ट व खर्च लागतो, या कारणांमुळे देखील सोयाबीनचे क्षेत्र वाढले आहे. २०२१ च्या खरीप हंगामात सोयाबीनचे सर्वसाधारण क्षेत्र हे एक लाख ९० हजार ७४८ इतके होते. त्या तुलनेत सोयाबीनचा पेरा दोन लाख ८४ हजार ९७४ हेक्टर क्षेत्रावर झाला आहे. मात्र, ‘मिली बग’च्या प्रादुर्भावामुळे हेक्टरी उतारा कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

...

काय आहे मिली बग

मिली बग ही एक कीड आहे. याला मराठीत पिठ्या ढेकूण म्हणतात. हा अंडी न घालता पिलांना जन्म देतो. अंगावर लोकरीसारखे आवरण असल्याने सहसा कुठलेही कीटकनाशक या किडीच्या शरीरात प्रवेश करत नाही. जास्वंद, सीताफळ व पपई या पिकांवर प्रामुख्याने आढळतो. मिली बग ही कीड झाडातील रस शोषण करते व झाडाला कमजोर करते.

..

मिली बग रोखण्यासाठी घ्या काळजी

मिली बग या किडीचे प्रमाण प्रामुख्याने शेताच्या बांधाकडील झाडावर अधिक दिसून येते. या किडीचे वेळीच नियंत्रण करायचे असेल तर क्लोरोपायरीफॉस ४० मिली २० ईसीमध्ये मिसळून तसेच बोरोफ्राईज १.५ मिली प्रत्येक लिटर फवारणी करावी. फवारणी केल्यास याचे नियंत्रण शक्य आहे.

..

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी सोयाबीन पीक पाण्याखाली आहे. त्यामुळे मिली बगपेक्षा इतर काही रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. याच्या नियंत्रणासाठी कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत.

-बाबासाहेब जेजूरकर, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, बीड.

...

शेतकऱ्यांवरील संकट कायम आहे

मागील वर्षी सोयाबीनचे बियाणे बोगस निघाल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. यावर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे उत्पन्न कमी होण्याची शक्यता आहे. शासनाने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी.

-सतीष जगताप, शेतकरी.

..

यावर्षी रोगांचा प्रादुर्भाव कमी होता. भाव वाढल्यामुळे सोयाबीनचा पेरा वाढला आहे. मात्र, अतिवृष्टीमुळे उत्पादनात घट होणार असून, नुकसानभरपाई द्यावी.

-काकासाहेब खंडागळे, शेतकरी.

..

सायोबीनचा पेरा हेक्टरमध्ये

वर्ष पेरा भाव

२०१७ ८२०००० ३२००

२०१८ ९८००० ३६००

२०१९ १२००२१ ३७००

२०२० १९८४२० ४२००

२०२१ २८४७४८ ७०००-१००००

Web Title: Rising prices led to soybean sowing, the 'Millie Bug' shattered dreams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.