अपघाताचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:24 AM2021-07-16T04:24:01+5:302021-07-16T04:24:01+5:30

नियमांना हरताळ शिरूर कासार : शहरात मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होत आहे, तर कधी वाढ होत आहे. ...

Risk of accident | अपघाताचा धोका

अपघाताचा धोका

Next

नियमांना हरताळ

शिरूर कासार : शहरात मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होत आहे, तर कधी वाढ होत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लादले असून, रस्त्यावर भाजी, फळ विक्रेते आदींची गर्दी दिसून येत आहे.

लसीकरणासाठी झुंबड

वडवणी : वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणणे तसेच बाधित रुग्णांना उपचार मिळण्यासाठी तालुका प्रशासन प्रयत्न करत आहे. लस घेण्यासाठी वडवणी प्राथमिक आरोग्य केंद्रात नागरिकांची झुंबड उडत आहे. तसेच चिंचवण व कुप्पा या तीन केंद्रांवर लसीकरण चालू आहे.

पुलाच्या दुरुस्तीची गरज

वडवणी : वडवणीहून कवडगावकडे जाण्यासाठी एकमेव मुख्य रस्ता आहे. या रस्त्यावर मामला तलावानजीक जुना पूल धोकादायक बनला असून पुलाचे कठडे तुटले असून, पुलावर खड्डे पडले असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे दुरुस्तीची मागणी वाहनधारकांनी केली आहे.

एटीएममध्ये खडखडाट

धारूर : शहरातील बँकेच्या एटीएममध्ये पैसे नसल्याने खडखडाट झाला आहे. त्यामुळे कामासाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत आहे. सद्य:स्थितीत बँकेत गर्दी असते. त्यामुळे अनेक नागरिक एटीएमचा वापर करून पैसे काढतात, परंतु एटीएममध्ये पैशांचा खडखडाट दिसून येत आहे.

Web Title: Risk of accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.