जैविक कचऱ्याचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:32 AM2021-01-03T04:32:58+5:302021-01-03T04:32:58+5:30
सुविधा द्याव्यात नेकनूर : येथील आठवडी बाजार दर रविवारी भरतो. लाॅकडाऊन कालावधीत हा बाजार बंद होता. निर्बंध उठल्यानंतर ...
सुविधा द्याव्यात
नेकनूर : येथील आठवडी बाजार दर रविवारी भरतो. लाॅकडाऊन कालावधीत हा बाजार बंद होता. निर्बंध उठल्यानंतर पुन्हा एकदा बाजार भरण्यास सुरुवात झाली आहे. मात्र बाजार सुरू झाला असून, असुविधेमुळे भाजी विक्रेत्यांची व्यापाऱ्यांची गैरसोय होत आहे.
वाहतूक नियमांचे होतेय उल्लंघन
बीड : शहरात खरेदीसाठी नागरिक गर्दी करू लागले आहेत. परंतु काही दुचाकीस्वार राँग साइडने वाहने चालवून वाहतूक नियमांचे उल्लंघन करत आहेत. यामुळे वाहतूक कोंडीही होत आहे. चौकाचौकात पोलीस असले तरी नागरिकांच्या गाफिलपणामुळे वाहतूक कोंडी होत असल्याचे दिसत आहे. यासाठी नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.
रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहनधारक त्रस्त
अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरातील योगेश्वरी नगरी ते वाघाळा रस्ता या मुख्य रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसामुळे हा रस्ता मोठ्या प्रमाणात खचला आहे. या मुख्य रस्त्यावर अनेक वसाहती आहेत. या वसाहतीतील रहिवाशांना या रस्त्याने जाता-येताना मोठा त्रास सहन करावा लागतो. मोठमोठ्या खड्ड्यांत दुचाकी व चारचाकी वाहने अडकून पडतात. लहान-मोठे अपघात या रस्त्यावर सातत्याने घडत आहेत, अशी स्थिती असूनही शासनाच्या वतीने या रस्त्याकडे दुर्लक्ष होत आहे. हा रस्ता तत्काळ दुरुस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.
रस्त्यालगत काटेरी झुडपे वाढली
अंबाजोगाई : तालुक्यात ग्रामीण भागात असणाऱ्या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात काटेरी झुडपे वाढली आहेत. यावर्षी मोठा पाऊस झाल्याने गवत व झुडपात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना काटेरी झुडपे वाढल्याने रस्त्याने जाणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा त्रास होत आहे. प्रशासनाने रस्त्यालगत वाढलेली ही काटेरी झुडपे तोडून प्रवाशांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे.