रितीका फफाळ नवोदय विद्यालयास पात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:33 AM2021-01-03T04:33:07+5:302021-01-03T04:33:07+5:30
जिल्ह्यात २५२ रुग्णांवर उपचार सुरू बीड : जिल्ह्यात कोरोनाबाधित २५२ रुग्णांवर सीसीसी आणि परवानगीकृत रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. जिल्हा ...
जिल्ह्यात २५२ रुग्णांवर उपचार सुरू
बीड : जिल्ह्यात कोरोनाबाधित २५२ रुग्णांवर सीसीसी आणि परवानगीकृत रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. जिल्हा रुग्णालयात ९१, लोखंडी सावरगाव येथील रुग्णालयात २८, स्वाराती जीएमसीमध्ये ६२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोविडकेअर सेंटरवर २३, डीसीएचसी सेंटरवर १५ तसेच खाजगी रुग्णालयात ३३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
१६०५५ कोरोनामुक्त
बीड : जिल्ह्यात आतापर्यंत १६ हजार ५५ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. १ लाख ८१ हजार १३० रूग्णांची तपासणी करण्यात आली असून, १ लाख ६४ हजार २८६ रुग्णांचा अहवाल निगेटीव्ह आलेला आहे. आतापर्यंत १६ हजार ८४४ रुग्ण पॉझिटिव्ह आढळलेले असल्याचे आरोग्य सूत्रांनी सांगितले.
विविध झाडे लावत नववर्षाचे स्वागत
बीड : शहरातील पर्यावरण मित्र व्यंकटेश माने आयोजित नववर्ष वृक्षारोपण उपक्रम १ जानेवारी रोजी साजरा झाला. विविध रंगेबिरंगी फुलांची, फळांची, तसेच पक्ष्यांना उपयुक्त अशी झाडे लावण्यात आली. युथ फॉर फ्युचर ग्रुपने यात श्रमदान केले. वृक्षमित्र जालिंदर भास्करे अन नितीश अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षलागवड व संगोपनाची प्रतिज्ञा घेतली. इस्कॉनचे साधू कृष्णनाम प्रभुजींचे कार्यक्रमास आशीर्वाद लाभले. जिव्हाळाचे राजू वंजारे व जाणीव ग्रुप यांनी कौतुक केले. महिलांचा विशेष उत्साह पहायला मिळाला.
मृत्यूदर ३.१६ टक्के
बीड : जिल्ह्यात कोरोना रुग्णांवर १४ केंद्रांवरून रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा मृत्यूदर ३.१६ टक्के इतका आहे. आतापर्यंत ५३३ रुग्णांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. पॉझिटिव्हीटी रेट १२.१, तर रिकव्हरी रेट ९५.३१ टक्के असल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.