अंबाजोगाई ते देवळा रस्ता खराब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:36 AM2021-05-11T04:36:02+5:302021-05-11T04:36:02+5:30
‘फिजिकल डिस्टन्स’चे पालन करणे गरजेचे बीड : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शासनाने ...
‘फिजिकल डिस्टन्स’चे पालन करणे गरजेचे
बीड : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शासनाने अत्यावश्यक सेवेची दुकाने उघडण्यास मुभा दिली आहे. मात्र या ठिकाणी ‘फिजिकल डिस्टन्स’चे पालन होत नसल्याने प्रादुर्भाव वाढण्याचा मोठा धोका निर्माण होत आहे.
गल्लीबोळातील दुकाने सुरूच
बीड : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून कठोर उपाययोजना केल्या जात आहेत. तरीही तालुक्यातील नागरिकांना याचे अजूनही गांभीर्य नाही. शहरात असणारी गल्लीबोळातील अनेक दुकाने दिवसभर सुरूच असतात. तसेच नागरिकही दिवसभर रस्त्यावर भटकत असतात. अशा लोकांवर कारवाई करावी, अशी मागणी जनतेतून होत आहे.
अनुदानात वाढ करण्याची मागणी
अंबाजोगाई : निराधारांना शासनाकडून दर महिन्याला अत्यल्प अनुदान दिले जाते. दिले जाणारे हे अनुदान अत्यंत कमी प्रमाणात आहे. महागाईत प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे अनुदानातही वाढ करण्यात यावी. तसेच सध्या कोरोनाच्या काळात कामे उपलब्ध नसल्याने उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे अशा लाभार्थींच्या अनुदानात वाढ करावी, अशी मागणी निराधारांमधून केली जात आहे.