हनुमाननगरात रस्ता व नाली कामांना सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:38 AM2021-07-14T04:38:58+5:302021-07-14T04:38:58+5:30

बीड : बीड नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील हनुमाननगर येथे सोमवारी नगरसेवक अमर नाईकवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत तीन ठिकाणच्या ...

Road and drain works started in Hanuman Nagar | हनुमाननगरात रस्ता व नाली कामांना सुरुवात

हनुमाननगरात रस्ता व नाली कामांना सुरुवात

Next

बीड : बीड नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील हनुमाननगर येथे सोमवारी नगरसेवक अमर नाईकवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत तीन ठिकाणच्या सिमेंट रस्ता व नाली या विकास कामांना परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली. प्रभागातील उर्वरित भागातील विकास कामांनाही लवकरच सुरुवात होणार असल्याची माहिती नगरसेवक नाईकवाडे यांनी दिली.

बीड पालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सिमेंट रस्ता व नाली कामे प्रस्तावित केली होती. या कामांना मंजुरी मिळाल्यानंतर आता सोमवारपासून प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली. जेष्ठ नागरिकांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या कामांचे नगरसेवक अमर नाईकवाडे यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. २०११ साली हनुमाननगर हा भाग नगर परिषद हद्दीमध्ये समाविष्ट करण्यात आला. गेल्या दहा वर्षात या भागात खूप अल्प प्रमाणात विकास कामे करण्यात आली होती. नगरसेवक अमर नाईकवाडे यांच्या माध्यमातून सदरील भागात मोठ्या प्रमाणात विकास कामे होत असल्याने, या भागातील ज्येष्ठ नागरिकांनी नगरसेवक नाईकवाडे यांचा सत्कार करून आभार मानले. यावेळी रामदास सरवदे, संतोष क्षीरसागर, बाळासाहेब (रंगनाथ) शिंदे, नितीन वीर, गंगाधरराव मिसाळ, प्रल्हादराव शिंदे, निवृत्तीराव जगताप, जालिंदरराव मुळे, प्रभुजी कोकणे, श्रीमंतराव वीर, मोहनराव तोडकर, भगवानराव पंडित, बापूराव जाधव, हनुमानराव लोखंडे, छत्रभुज क्षीरसागर यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

120721\205712_2_bed_22_12072021_14.jpeg

पेठबीडमधील हनुमान नगर भागात रस्ता कामांना ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते सुरूवात करण्यात आली. यावेळी नगरसेवक अमर नाईकवाडे व नागरिक उपस्थित होते.

Web Title: Road and drain works started in Hanuman Nagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.