सौताडा घाटातील रस्त्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:37 IST2021-08-12T04:37:04+5:302021-08-12T04:37:04+5:30
..... विहिरींची पाणी पातळी खालावली धानोरा : आष्टी तालुक्यातील धानोरा परिसरात गेल्या महिनाभरापासून पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे विहिरी, ...

सौताडा घाटातील रस्त्याची दुरवस्था
.....
विहिरींची पाणी पातळी खालावली
धानोरा : आष्टी तालुक्यातील धानोरा परिसरात गेल्या महिनाभरापासून पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे विहिरी, बोअरवेलच्या पाणी पातळीत घट झाली आहे. शेतातील खरिपाची पिके पावसाअभावी सुकू लागली आहेत. त्यामुळे शेतकरी पिकांना पाणी देत आहेत. दरम्यान, काही भागात पिण्याच्या पाण्याची टंचाईही जाणवत आहे.
....
वेलतुरी तलावातील पाण्याने गाठला तळ
धानोरा : आष्टी तालुक्यातील वेलतुरी येथील तलाव गेल्या वर्षी पूर्ण क्षमतेने भरला होता. त्यातील पाणी अजूनपर्यंत शिल्लक होते. परंतु यंदा ऑगस्ट महिना सुरू होऊन १० दिवस उलटत आले तरी मोठा पाऊस झाला नाही. यामुळे तलावातील पाण्याने तळ गाठला आहे. यामुळे लाभक्षेत्रातील शेतकरी चिंतेत आहे. दरम्यान, मोठ्या पावसाची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.
....
सावरगाव, शेडाळा परिसरातील पिके धोक्यात
धानोरा : आष्टी तालुक्यातील धानोरा, शेडाळा, देवळगाव, वेलतुरी परिसरात पाऊस नसल्याने खरिपातील पिके धोक्यात आली आहेत. गेल्या २५ दिवसांपासून या परिसरात पावसाने दडी मारली आहे. यामुळे उडीद, कांदा, बाजरी, तूर पिकांनी माना टाकल्या आहेत. यामुळे शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडण्याची चिन्हे आहेत.
....
सीना, मेहकरी प्रकल्पात पाणी सोडण्याची मागणी
कडा : आष्टी तालुक्यातील सीना, मेहकरी प्रकल्पातील पाणीसाठा कमी झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पाऊस नसल्याने पिकांसाठी पाणी उपसा सुरू आहे. कुकडी प्रकल्पातील धरणे भरत आली आहेत. तरी कुकडीच्या प्रकल्पातील पाणी सीना, मेहकरी धरणात तातडीने सोडावे, अशी मागणी आष्टी तालुक्यातील शेतकरी वर्गातून होत आहे.
......
आठवडी बाजार पूर्ववत करण्याची शेतकऱ्यांची मागणी
आष्टी : तालुक्यातील आष्टी, कडा, धानोरा येथील आठवडी बाजार कोरोनामुळे बंद करण्यात आले होते. अजूनही आष्टी तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला नाही. त्यामुळे कोरोना नियमांचे बंधन आहे. यामुळे आठवडी बाजार पूर्ण क्षमतेने भरत नाही. यामुळे शेतकऱ्यांना आपला भाजीपाला व इतर शेतीमाल विक्रीसाठी अडचणी येत आहेत. तरी प्रशासनाने कोरोना नियम घालून बाजार पूर्ववत सुरू करावेत, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
....