आत्मदहनाचा इशारा देताच त्या शेतकऱ्यांना दिला रस्ता - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:02 AM2021-03-04T05:02:52+5:302021-03-04T05:02:52+5:30
केज तालुक्यातील सोनेसांगवी येथील शेतकरी महादेव बाळासाहेब इखे, अनंत आबासाहेब कणसे, मारुती नानासाहेब कणसे, रामेश्वर शाहूराव गुळवे, शिवाजी ...
केज तालुक्यातील सोनेसांगवी येथील शेतकरी महादेव बाळासाहेब इखे, अनंत आबासाहेब कणसे, मारुती नानासाहेब कणसे, रामेश्वर शाहूराव गुळवे, शिवाजी हरिभाऊ इखे, पांडुरंग उत्तम इटकर, चांगदेव छगन यादव यांची सर्वे नं. २१,२२,१५,२५,मध्ये जमीन आहे. या जमिनीत सदरील शेतकऱ्यांनी १३ ते १४ महिन्यापूर्वी उसाची लागवड केली आहे सदरील ऊस हा साखर कारखाने बंद होण्याची वेळ आली तरीही रस्ता नसल्याने शेतात उभा असल्याने शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान होऊ लागले. शेतातील ऊस साखर कारखान्यास तोडून पाठविण्यासाठी रस्ता देण्यात यावा, अशी मागणी सदरचे शेतकरी तहसीलदार केज यांच्या कडे सातत्याने करत होते. मात्र सदर शेतकऱ्याच्या रस्त्याच्या मागणीकडे महसूल प्रशासन सातत्याने दुर्लक्ष करत आल्याने रस्त्याच्या मागणीसाठी सात शेतकऱ्यांनी उसाच्या शेतात आत्मदहन करण्याचा इशारा तहसीलदार याना देऊन ते भूमिगत झाले. यामुळे महसूल प्रशासन खडबडून जागे झाले व त्या सात शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील ऊस घेऊन जाण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १४३ अन्वये मोजे सोने सांगवी शिवारातील सर्वे नंबर २८,२३,२४, २५,२७,१४,१३,१२,१५,२२,०९,१०,०६,मधील नंबर बांधावरील रस्ता खुला ठेवण्याचे आदेश तहसीलदार दुलाजी मेंढके यांनी दिले. तसेच शेतकऱ्यांना नंबर बांधावरून शेतीची वहिवाटीस येजा करण्यास अडथळा करू नये असे आदेशही तहसीलदार दुलाजी मेंढके यांनी पारित केले. रस्त्याचा प्रश्न कायमचा सुटला असल्याने त्यांनी आत्मदहन आंदोलन मागे घेतले