रिंगरोड परिसरात रस्त्याची दुर्दशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:32 AM2021-05-16T04:32:57+5:302021-05-16T04:32:57+5:30

अंबाजोगाई : शहरातील रिंगरोड परिसरात रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र, हे काम रखडल्याने हा पूर्ण रस्ता नादुरुस्त आहे. पडलेल्या ...

Road misery in the Ring Road area | रिंगरोड परिसरात रस्त्याची दुर्दशा

रिंगरोड परिसरात रस्त्याची दुर्दशा

Next

अंबाजोगाई : शहरातील रिंगरोड परिसरात रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र, हे काम रखडल्याने हा पूर्ण रस्ता नादुरुस्त आहे. पडलेल्या खड्डयांमुळे वाहनचालकांना वाहन चालवताना विविध संकटांना सामोरे जावे लागत आहे.

रस्त्यावर धुळीचे थर

परळी : शहरात सर्वत्र रस्त्यावर धुळीचे प्रमाण वाढल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच नागरिकांना याचा त्रास होत आहे. नगर परिषदेने रस्त्यावरील धुळीचा बंदोबस्त करून रस्ते स्वच्छ ठेवण्याची मागणी आहे.

हिंगणी रस्ता खराब

बीड : तालुक्यातील हिंगणी ते नांदूर रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. मागील अनेक दिवसांपासून रस्ता दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे. मात्र, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची मागणी होत आहे.

जनावरांचा ठिय्या

माजलगाव : शहरातील रस्त्यांवर अनेक मार्गावर जनावरे ठिय्या मांडून बसत असल्यामुळे वाहनचालकांना त्रास होत आहे. अनेकवेळा अपघाताची उदाहरणे आहेत. जनावरांच्या बंदोबस्ताची मागणी होत आहे; परंतु अद्यापही याकडे दुर्लक्षच केले जात आहे.

केबल चोरी वाढली

अंबाजोगाई : तालुक्यात सध्या शेतातील उसाला पाणी देणे सुरू आहे. मांजरा धरणाच्या डाव्या कालव्यांतून शेतीला पाणी सोडण्यात आले होते. विद्युतपंप चालवण्यासाठी केबल अंथरण्यात आले होते. या केबलची मोठ्या प्रमाणात चोरी होत आहे.

Web Title: Road misery in the Ring Road area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.