महामार्गालगतचा रस्ता खड्डेमय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:44 AM2021-06-16T04:44:31+5:302021-06-16T04:44:31+5:30
सुरळीत पाणी पुरवठ्याची मागणी बीड : नगर परिषदेकडून शहराला करण्यात येणारा पाणीपुरवठा अनियमितपणे करण्यात येत आहे. शहराच्या काही ...
सुरळीत पाणी पुरवठ्याची मागणी
बीड : नगर परिषदेकडून शहराला करण्यात येणारा पाणीपुरवठा अनियमितपणे करण्यात येत आहे. शहराच्या काही भागात तीन दिवसांआड आणि तेही सात ते आठ तास, तर काही भागात बारा ते पंधरा दिवसाआड आणि तेही फक्त दीड ते दोन तास याप्रमाणे पाणीपुरवठा होतो. शहरातील एकूण एक प्रभागांमध्ये पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा रहिवाशांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदनातून दिला आहे.
मास्क विकताना निष्काळजीपणा
बीड : मास्क विकताना निष्काळजीपणा होत असल्याचे दिसून येत आहे. अनेक ग्राहकांनी हाताळलेले आणि कव्हर नसलेले मास्क विक्री होताना दिसत आहेत. शहरातील औषध दुकानांमध्ये एन-९५ मास्कची शासकीय दराने विक्री होत नाही. एक तर मास्कचा तुटवडा दाखवला जातो; अन्यथा ते चढ्या भावाने विकले जातात. तसेच दोनपदरी आणि तीनपदरी मास्कच्या किमतीही दुपटीपेक्षा अधिक दराने विक्री केली जाते. यामुळे सामान्य ग्राहकांची लुबाडणूक होत आहे.
नेकनुरातील नदी पात्रांतून वाळू उपसा
बीड : तालु्क्यातील नेकनूर परिसरातील सात्रा पोत्रा, चांदेगाव या नदीपात्रात वाळू तस्करांनी उच्छाद मांडला आहे. रात्रीच्यावेळी जेसीबीच्या साह्याने वाळूचा उपसा करून टिपरने व ट्रॅक्टरने वाहतूक केली जात आहे. याकडे महसूल विभाग व पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने शासनाला मोठा भुर्दंड सहन करावा लागत आहे. वाळूचा उपसा बंदची मागणी करीत आंदोलनाचा इशारा दिला.