गढी महाविद्यालयातर्फे सडक सुरक्षा, जीवन रक्षा उपक्रम - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 05:01 AM2021-02-18T05:01:56+5:302021-02-18T05:01:56+5:30

भारत सरकार, युवा कार्यक्रम आणि खेल मंत्रालय, राष्ट्रीय सेवा योजना निर्देशालय, नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार ‘सडक सुरक्षा जीवन रक्षा’ ...

Road safety, life saving activities by Gadhi College - A | गढी महाविद्यालयातर्फे सडक सुरक्षा, जीवन रक्षा उपक्रम - A

गढी महाविद्यालयातर्फे सडक सुरक्षा, जीवन रक्षा उपक्रम - A

Next

भारत सरकार, युवा कार्यक्रम आणि खेल मंत्रालय, राष्ट्रीय सेवा योजना निर्देशालय, नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार ‘सडक सुरक्षा जीवन रक्षा’ या उद्दिष्टांनुसार कला व विज्ञान महाविद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. जनतेमध्ये वाहतुकीच्या नियमांचा प्रचार, प्रसार करण्यासाठी जनजागृती रॅली महाविद्यालय ते गढी चौकापर्यंत काढण्यात आली.

या दरम्यान दुचाकीस्वारांना हेल्मेटचे महत्त्व पटवून देण्यात आले. तसेच वाहन चालकांना वेगावर नियंत्रण, सीटबेल्टचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले. चालकांनीही योग्य प्रतिसाद दिला. वाढत्या सडक दुर्घटना रोखण्यासाठी वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. प्रत्येकाने आपण आपल्या सुरक्षेसाठी नियमांचे पालन केले तर निश्चितच अपघात कमी होतील, असे आवाहन करण्यात आले. नशा, मादक पदार्थांचे सेवन, वाहन चालवताना मोबाईलचा वापर टाळण्याबाबत जागृती करण्यात आली. याप्रसंगी प्राचार्य डॉ. विश्वास कदम, कार्यक्रमाधिकारी प्रा. हिरा पोटकुले, प्रा. रमेश रिंगणे, प्रा. रामहरी फाटक तसेच प्रा. राणी जाधव, प्रा. अयोध्या पवळ, प्रा. खताळ, प्रा. कलंदर पठाण, धुताडमल व राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक बहुसंख्येने उपस्थित होते.

Web Title: Road safety, life saving activities by Gadhi College - A

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.