ऊस दरासाठी शेतक-यांचा माजलगावात रास्तारोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 12:11 AM2017-12-01T00:11:23+5:302017-12-01T00:12:52+5:30
माजलगाव शहरातील शिवाजी चौक येथे शेतक-यांनी एकत्र येत गुरुवारी दोन तास रास्तारोको आंदोलन केले. यावेळी शेतकरी आक्रमक झाल्यामुळे पोलीस प्रशासनाला आंदोलनकर्त्यांना अटक करण्याची वेळ आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
माजलगाव : शहरातील शिवाजी चौक येथे शेतक-यांनी एकत्र येत गुरुवारी दोन तास रास्तारोको आंदोलन केले. यावेळी शेतकरी आक्रमक झाल्यामुळे पोलीस प्रशासनाला आंदोलनकर्त्यांना अटक करण्याची वेळ आली.
माजलगाव येथे अवघ्या २५ कि.मी. परिघामध्ये तीन कारखाने असून उसाचे प्रमाण देखील तितकेच आहे. कारखान्यांचे गळीत हंगाम सुरु होऊन महिना उलटला तरी कोणत्याही कारखान्याने अधिकृतरीत्या भाव जाहीर केलेला नाही. त्यामुळे मागील महिन्यांपासून कारखान्यांविरुध्द शेतकरी संघटना आंदोलन करीत आहेत.
दोनच दिवसांपूर्वी येथील तहसील कार्यालयात कारखाना प्रतिनिधी, शेतकरी आणि प्रशासकिय अधिकारी यांनी मिळून बैठक घेवून चर्चा घडवून आणली. मात्र यात देखील कसल्याही प्रकारचा तोडगा निघाला नाही. शेतकºयांनी पुन्हा एकत्र येत येथील शिवाजी चौकात सकाळी ११ वाजता रास्तारोको आंदोलन केले.
आंदोलनात राजेंद्र होके, डॉ.उध्दव नाईकनवरे, अॅड. नारायण गोले, मुसद्दीक बाबा, धम्मानंद साळवे, नितीन नाईकनवरे, संग्राम थावरे, नारायण होके, नुमान चाऊस, शेख रशीद, लखन सावंत, रामचंद्र डोईजड, आत्माराम ढिसले, राजाभाऊ शेजूळ, डिगांबर सोळंके, अंकुश जाधव, उत्तम झाटे यांचेसह शेतकरी सहभागी झाले.