चंदन सावरगाव ते जवळबन रस्त्याचे काम निकृष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:34 AM2021-02-20T05:34:57+5:302021-02-20T05:34:57+5:30
जि. प. बांधकाम विभागामार्फत गट ब मधून चंदनसावरगाव ते जवळबन रस्त्यावर ५०० मीटर पक्के खडीकरण व डांबरीकरणासाठी १० ...
जि. प. बांधकाम विभागामार्फत गट ब मधून चंदनसावरगाव ते जवळबन रस्त्यावर ५०० मीटर पक्के खडीकरण व डांबरीकरणासाठी १० लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आला. कोरोना काळात संचारबंदीचा गैरफायदा घेत कुठल्याही प्रकारची गुणवत्ता न राखता काम केल्याने २ महिन्यांतच रस्ता उखडून गेला आहे. लाडेगाव ते जवळबन या रस्त्यावरील ७०० मीटर खडीकरण, डांबरीकरण, पूल आदी कामे करण्यासाठी ३८ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता. मात्र या रस्त्यावर कुठलेही काम केलेले नसल्याने तात्काळ चौकशी करून दोषी अधिकारी व गुत्तेदार यांच्याविरोधात गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद पांचाळ, जवळबन शाखा अध्यक्ष सुग्रीव करपे यांनी बीड जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी, केजचे गटविकास अधिकारी, बांधकाम विभाग क्र. २ चे कार्यकारी अभियंत्यांना लेखी निवेदनाद्वारे केली आहे.