रस्त्यांची कामे रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:33 AM2021-04-25T04:33:20+5:302021-04-25T04:33:20+5:30

मास्क वापरण्याचे आवाहन बीड : जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात सामाजिक अंतर ठेवण्याचे आवाहन ...

Road works stalled | रस्त्यांची कामे रखडली

रस्त्यांची कामे रखडली

Next

मास्क वापरण्याचे आवाहन

बीड : जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात सामाजिक अंतर ठेवण्याचे आवाहन केले आहे. या आदेशाची अंमलबजावणी बऱ्याच ठिकाणी होताना दिसत नाही. अशाने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी नागरिकांनी मास्क, सॅनिटायझरचा वापर करून गर्दीत जाण्याचे टळावे, असे आवाहन आरोग्य प्रशासनाकडून होत आहे.

शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था

बीड : बीड बायपासचे काम पूर्णत्वास जाऊन दोन वर्षे उलटून गेलेली असताना शहरवासियांना लोकप्रतिनिधींनी दिलेले आश्वासन अद्यापही पूर्ण झालेले नाही. बीड शहरातून जाणाऱ्या मुख्य रस्त्याचे काम होणे अपेक्षित असताना याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसते. दर्जेदार रस्ते करून वाहनधारक, नागरिकांना सुविधा द्याव्यात, अशी मागणी होत आहे.

सिंमेंट रस्त्याला पडल्या भेगा

बीड : शहरातील पिंपरगव्हाण रोडवर सिंमेंट काँक्रीटचे काम करण्यात आले आहे. काम करून काही दिवसच उलटले आहेत. तरीही या रस्त्याच्या कामाला भेगा गेलेल्या आहेत. महिन्यापूर्वीच या रस्त्याचे काम करण्यात आले होते. हा रस्ता चार महिन्यांपूर्वी उखडून ठेवला होता. आता काम पूर्ण होऊनही काही दिवस उलटत नाही तोच या रस्त्याला भेगा पडल्या आहेत. यामुळे वाहनधारकांना त्रास होत आहे.

Web Title: Road works stalled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.