रस्त्यावरील अडथळे दूर करावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:33 AM2021-05-16T04:33:00+5:302021-05-16T04:33:00+5:30

उसाला पाणी देता येईना माजलगाव : तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कडक उन्हाळ्यामुळे ...

Roadblocks should be removed | रस्त्यावरील अडथळे दूर करावेत

रस्त्यावरील अडथळे दूर करावेत

Next

उसाला पाणी देता येईना

माजलगाव : तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कडक उन्हाळ्यामुळे विहिरी व विंधन विहिरीच्या पाणीपातळीवर परिणाम होऊ लागला आहे. तालुक्यातील काही भागांत विहिरींनी तळ गाठला आहे. तालुक्यात यावर्षी उसाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. पाणीपातळी घटत चालल्याने उसाला पाणी द्यायचे कसे? असा प्रश्न ऊस उत्पादक शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.

गेवराई परिसरात

चोऱ्यांचे प्रमाण वाढले

गेवराई : शहरातील हद्दवाढ झालेल्या भागात चोऱ्यांचे प्रमाणात वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरांचा बंदोबस्त करून शहरात पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे. पोलीस ठाण्याचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. याकडे पोलीस प्रशासनाने लक्ष देऊन चोऱ्यांचा शोध लावण्याची मागणी केली जात आहे.

विनामास्क न फिरण्याचे आवाहन

बीड : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या काही अंशी कमी होत असल्याने, नागरिक बिनधास्त मास्क न लावताच फिरत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. नागरिकांनी गाफील राहू नये, असे आवाहन आरोग्य विभागाकडून केले जात आहे.

सात्रा, पोत्रा भागात वाळू उपसा

बीड : तालुक्यातील नेकनूर परिसरातील सात्रा, पोत्रा, चांदेगाव या नदीपात्रात वाळू तस्करांनी उच्छाद मांडला आहे. रात्रीच्या वेळी जेसीबीच्या साह्याने वाळूचा उपसा करून टिपरने व ट्रॅक्टरने वाहतूक केली जात आहे. याकडे महसूल विभाग व पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने शासनाला मोठा भुर्दंड सहन करावा लागत आहे.

Web Title: Roadblocks should be removed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.