ग्रामीण भागातील रस्ते ठरताहेत धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:23 AM2021-06-10T04:23:06+5:302021-06-10T04:23:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : ग्रामीण भागातील सर्वच रस्त्यांची दुरवस्था झाली असून, या रस्त्याने वाहने तर सोडा, साधे पायी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : ग्रामीण भागातील सर्वच रस्त्यांची दुरवस्था झाली असून, या रस्त्याने वाहने तर सोडा, साधे पायी चालणेही अवघड झाले आहे. अनेक मार्गांवरील खड्ड्यांची मोजदाद केली तर हा मार्ग कधी डांबरीकरण झाला होता का नाही, असा प्रश्न नागरिकांना पडत आहे.
खड्डेमय रस्त्याने अपघाताच्या घटनाही वाढल्या आहेत. अनेक रस्त्यांवर तर डांबर शोधूनही सापडत नसल्याचे चित्र आहे.
अगदी नजीकच्या ८ ते १० किलोमीटर लांबीच्या ग्रामीण मार्गाची डागडुजी, दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद बांधकाम विभागाने केली की नाही, हा संशोधनाचा विषय आहे. साखर कारखाना ते धानोरा या गावाचे किमान अंतर नऊ किलोमीटर आहे. मागील अनेक वर्षांपासून या रस्त्यावर बांधकाम विभागाने प्रतिवर्षी देखभाल- दुरुस्ती केली नाही. प्रत्येक वर्षी या मार्गाची दुरवस्था अधिक प्रमाणात होत गेली आहे. सार्वजनिक बांधकाम कार्यालयांतर्गत असणारे अनेक रस्ते आजही डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहेत. अंबासाखर ते देवळा हा मुख्य मार्गही मोठ्या प्रमाणात उखडला आहे, तर सहा महिन्यांपूर्वी झालेल्या राडीतांडा ते मुडेगाव या रस्त्याची चाळण झाली आहे. हा रस्ता खराब झाला असला तरीही या रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या साइडपट्ट्यांचे काम अजूनही झालेले नाही. अशीच दुरवस्था राडी ते मुडेगाव या रस्त्याची झालेली आहे.
ग्रामीण भागात अनेक रस्त्यांची अगदी चाळण झाली आहे. वरचेवर ठिगळ लावल्यासारखी दुरुस्ती करून जबाबदारी पूर्ण केल्याचे समाधान बांधकाम विभागाचे अधिकारी करून घेत आहेत. मात्र त्यांच्या या कारभाराने अनेकांनी याच रस्त्यावर जीव गमावला आहे.
पावसाळ्यात अनेक रस्ते नागरिकांना त्रासदायक ठरू लागले आहेत. यावर तातडीने बांधकाम विभागाने लक्ष घालून रस्ता रहदारीसाठी सुरळीत करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
===Photopath===
090621\avinash mudegaonkar_img-20210604-wa0069_14.jpg