प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून केज मतदारसंघात साडेअकरा कोटींचे रस्ते मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:24 AM2021-07-18T04:24:07+5:302021-07-18T04:24:07+5:30

अंबाजोगाई : केज तालुक्यासाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून एकूण ११ कोटी ७० लाख रुपयांच्या दोन रस्त्याच्या कामांना मंजुरी मिळाली ...

Roads worth Rs 11.5 crore sanctioned in Pradhan Mantri Gram Sadak Yojana in Cage constituency | प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून केज मतदारसंघात साडेअकरा कोटींचे रस्ते मंजूर

प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून केज मतदारसंघात साडेअकरा कोटींचे रस्ते मंजूर

Next

अंबाजोगाई : केज तालुक्यासाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून एकूण ११ कोटी ७० लाख रुपयांच्या दोन रस्त्याच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. लवकरच होणाऱ्या या नवीन रस्त्यांमुळे या भागातील ग्रामस्थांचा प्रवास सुखकर होणार आहे.

बीड जिल्ह्याच्या खासदार प्रीतम मुंडे आणि केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता अक्षय मुंदडा यांच्या प्रयत्नाने हा निधी मंजूर झाला होता. केज तालुक्यातील सांगवी (सारणी) - बेलगाव - केळगाव ते राज्य रस्ता (क्र. २२२) आणि चंदनसावरगाव - कळंबआंबा - आडस या दोन्ही रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळणी झाली असून, या भागातील ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे आ. नमिता मुंदडा यांनी दोन्ही रस्त्यांच्या नवीन कामाची मागणी केली होती. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून या दोन्ही रस्त्यांच्या कामासाठी मंजुरी मिळाली आहे. त्यात सांगवी (सारणी) - बेलगाव - केळगाव ते राज्यरस्ता (क्र. २२२) या रस्त्याच्या कामासाठी ७ कोटी १० लाख रुपये, तर चंदनसावरगाव - कळंबआंबा - आडस या रस्त्यासाठी ४ कोटी ६० लाख रुपयांच्या रस्त्याच्या समावेश आहे. सदर रस्त्यांच्या कामास लवकरच प्रारंभ होणार असून, या भागातील ग्रामस्थांनी केलेली रस्ते बांधकामाची मागणी आता पूर्णत्वास जाणार आहे. एकूण ११ कोटी ७० लाख रुपयांचा या दोन रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळाल्याने बेलगाव, केळगाव, सांगवी सारणी, चंदनसावरगाव कळंबआंबा, आडस परिसरातील ग्रामस्थांनी खा. प्रीतम मुंडे व आ. नमिता मुंदडा याचे आभार मानले आहेत.

Web Title: Roads worth Rs 11.5 crore sanctioned in Pradhan Mantri Gram Sadak Yojana in Cage constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.