मोठ्या शिताफीने पकडलेल्या दरोडेखोराचे काही तासातच पोलीस ठाण्यातून पलायन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 11:44 AM2021-09-02T11:44:08+5:302021-09-02T11:44:52+5:30

Robber escaped from Ambajogai City Police Station :

The robber, who was caught by a Local Crime Branch, escaped from the Ambajogai City Police Station within a few hours | मोठ्या शिताफीने पकडलेल्या दरोडेखोराचे काही तासातच पोलीस ठाण्यातून पलायन

मोठ्या शिताफीने पकडलेल्या दरोडेखोराचे काही तासातच पोलीस ठाण्यातून पलायन

Next
ठळक मुद्देअंबाजोगाई शहर ठाण्यातील प्रकारआरोपीच्या शोधार्थ दोन पथके रवाना

बीड/अंबाजोगाई: सहा वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या सराईत दरोडेखोराला स्थानिक गुन्हे शाखेने ( Crime Branch ) मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. मात्र, या आरोपीने पोलिसांच्या हातावर तुरी ठेवत पोलीस ठाण्यातून धूम ठोकली. १ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजता अंबाजोगाई शहर ठाण्यात हा प्रकार घडला. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून आरोपीच्या शोधार्थ दोन पथके रवाना करण्यात आली आहेत. ( The robber, who was caught by a Local Crime Branch, escaped from the Ambajogai City Police Station within a few hours) 

समाधान वैरागे (३२,रा.जवळबन ता.केज) असे त्या आरोपीचे नाव आहे. २०१६ मध्ये अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पेट्रोलपंपावर दरोडा पडला होता. या गुन्ह्यात त्याचा सहभाग होता. मात्र, पोलिसांना तो सापडत नव्हता. दरम्यान, तो जवळबन येथे असल्याची माहिती मिळाल्यावरुन १ सप्टेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक सतीश वाघ यांनी उपनिरीक्षक संतोष जोंधळे यांच्या नेतृत्वाखाली पथक रवाना केले. या पथकाने दिवसभर पाळत ठेऊन सायंकाळी समाधान वैरागे याच्या मुसक्या आवळल्या. दरम्यान , वैद्यकीय तपासणी करुन त्यास अंबाजोगाई शहर पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर पथक निघून आले. ठाणे अंमलदाराच्या खुर्चीजवळ बसलेल्या समाधान वैरागे याने पोलीस कामात व्यस्त असल्याची संधी साधत रात्री साडेआठ वाजता ठाण्यातून  पलायन केले. तो पळून गेल्याने ठाण्यात एकच गोंधळ उडाला. गुन्हे शाखेने मोठ्या शिताफीने पकडलेला आरोपी शहर पोलिसांच्या ताब्यातून पळाल्याने खळबळ उडाली आहे.

हेही वाचा - स्वार्थापुढे नाते तुटले; स्वस्त धान्य दुकानाच्या वादातून भावानेच भावाला संपवले

दोन पथके मागावर
समाधान वैरागे हा हिस्ट्रीशीटर असून त्याच्यावर दरोड्यासारखे गंभीर गुन्हे नोंद आहेत. त्याच्या शोधासाठी गुन्हे शाखा व शहर पोलीस ठाण्याचे एक अशी दोन पथके रवाना करण्यात आली आहेत. गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक सतीश वाघ व अंबाजोगाई शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार या पथकांच्या संपर्कात आहेत.

Web Title: The robber, who was caught by a Local Crime Branch, escaped from the Ambajogai City Police Station within a few hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.