चाकूचा धाक दाखवून व्यापाऱ्यांना लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 11:51 PM2019-07-02T23:51:54+5:302019-07-02T23:52:26+5:30
तालुक्यातील २२२ महामर्गावरील भेंड फाटयाजवळ माजलगावहून नाशिककडे फळे आणण्यासाठी जाणाºया व्यापाऱ्यांना चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून लुटल्याचा प्रकार सोमवारी रात्री घडला.
गेवराई : तालुक्यातील २२२ महामर्गावरील भेंड फाटयाजवळ माजलगावहून नाशिककडे फळे आणण्यासाठी जाणाºया व्यापाऱ्यांना चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून लुटल्याचा प्रकार सोमवारी रात्री घडला. याप्रकरणी तलवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
माजलगाव येथील फळविक्रेते फारुक हमीद यांच्यासोबत इतर दोघे जण नाशिक येथून फळेआणण्यासाठी भाड्याच्या पिकअप ( क्र. एमएच २२ एए ३०३६ ) मधून सोमवारी रात्री जात होते. रात्री १० च्या सुमारास चहा पिण्यासाठी गेवराई तालुक्यातील भेंड फाटा येथे थांबले. त्यावेळी तीन ते चार चोरटे तेथे आले व व्यापाºयाला चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील दोन लाख रुपये लुटले. चहा पिण्यासाठी थांबल्यानंतर आपल्याकडे पैसे असल्याचे त्या चोरट्यांना कसे कळले त्यांनी चाकूचा धाक आपल्यालाच का दाखवला, असा प्रश्न व्यापाºयांना पडला होता. त्यानंतर फळे आणण्यासाठी जे पिकअप भाड्याने घेतले होते त्याच्या चालकावर त्यांनी संशय व्यक्त केला. त्यानंतर मंगळवारी तलवाडा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी संशय असलेल्या पिकअप चालकाची सखोल चौकशी केली असता या कटामध्ये त्याचा हात असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई उपअधीक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली उनवणे, बहिरवाळ, वडकर, मुंजाळ यांनी केली. इतर आरोपींचा शोध आहे.