लाचखोरांचा ‘दरोडा’, २६० अधिकारी, कर्मचाऱ्यांनी टेबलाखालून कमावली करोडोंची मालमत्ता
By सोमनाथ खताळ | Updated: February 18, 2025 09:34 IST2025-02-18T09:33:33+5:302025-02-18T09:34:49+5:30
रिक्षाचालकाकडून ३०० रुपयांचा हप्ता घेण्यापासून ते लाखो, करोडाे रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी आतापर्यंत राज्यात अनेक बडे मासे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या गळाला लागले आहेत.

लाचखोरांचा ‘दरोडा’, २६० अधिकारी, कर्मचाऱ्यांनी टेबलाखालून कमावली करोडोंची मालमत्ता
सोमनाथ खताळ
बीड : गलेलठ्ठ पगार असतानाही प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी गरिबांच्या खिशावर दरोडा टाकत आहेत. याच लाचखोरीच्या पैशांतून ११ वर्षांत २६० जणांनी करोडो रुपयांची मालमत्ता जमा केली आहे. कायदे कडक केले जात असले तरी भ्रष्टाचार काही केल्या थांबत नसल्याचे समोर आले आहे.
रिक्षाचालकाकडून ३०० रुपयांचा हप्ता घेण्यापासून ते लाखो, करोडाे रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी आतापर्यंत राज्यात अनेक बडे मासे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या गळाला लागले आहेत. नियमांत होणाऱ्या कामांसाठीही अधिकारी, कर्मचारी सामान्यांकडून लाच घेतात. काही लोक याची तक्रार करतात. त्यामुळेच हे भ्रष्ट अधिकारी, कर्मचारी पकडले जातात.
...अशी आहे दहा वर्षांतील कारवाईची आकडेवारी
२०१४- १,२४५
४८
२०१५ – १२३५
३५
२०१६- ९८५
१७
२०१७- ८७५
२२
२०१८- ८९१
२०१९- ८६६
२०
२०२०- ७६४
७
२०२१- ७२८
१२
२०२३- ७९५
१२
२०२४- ६८३
३१