खासगी डाॅक्टरकडून कोविडच्या रुग्णांची लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:33 AM2021-05-14T04:33:13+5:302021-05-14T04:33:13+5:30
पत्रकारांशी बोलतांना बाबुराव पोटभरे म्हणाले की, जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती हाताळण्यात प्रशासकीय यंत्रणा निष्क्रिय ठरली आहे. रुग्णांचा गैरफायदा घेऊन कोविडच्या ...
पत्रकारांशी बोलतांना बाबुराव पोटभरे म्हणाले की, जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती हाताळण्यात प्रशासकीय यंत्रणा निष्क्रिय ठरली आहे. रुग्णांचा गैरफायदा घेऊन कोविडच्या नावावर खासगी डाॅक्टर व रुग्णालय आर्थिक लूट करत आहेत. रुग्णांचे वाढीव बिले करून टाळूवरचे लोणी खाण्याचे पाप खासगी डाॅक्टर करत आहेत. त्यामुळे शासनाने खासगी रुग्णालय व खासगी डाॅक्टरांच्या बिल तपासणीसाठी चौकशी समिती नेमावी तसेच पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी लक्ष देण्याची गरज आहे. जनतेची होणारी लूट थांबावी, जिल्हा अत्यंत नाजूक परिस्थितीचा सामना करत आहे. काही लोक या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन कोविड रुग्णांना लुटण्याचा व्यवसाय सुरू केला आहे.
तज्ज्ञ डाॅक्टरांचा सहभाग नाही
बनावट नावे देऊन कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहेत. या लुटारूंची जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करून असे सेंटर बंद करावेत, परळीच्या धरतीवर पालकमंत्री मुंडे यांनी जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात समान आरोग्य सुविधा पुरवावी व कोरोना रुग्णांना दर्जेदार सुविधा द्याव्यात, अशी मागणी बहुजन विकास मोर्चाचे अध्यक्ष तथा नियोजन समिती सदस्य बाबुराव पोटभरे यांनी केली आहे.