बीडच्या रोहन बहिरला राष्ट्रपतींच्या हस्ते ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’, नदीत वाहणाऱ्या महिलेचे वाचवले होते प्राण

By शिरीष शिंदे | Published: January 23, 2023 09:05 PM2023-01-23T21:05:50+5:302023-01-23T21:06:03+5:30

नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाच्यावतीने ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार २०२३’ पुरस्कार प्रदान कार्यक्रम पार पडला.

Rohan Bahir of Beed was awarded 'Prime Minister's National Child Award' by the President, for saving the life of a woman who was drowning in a river | बीडच्या रोहन बहिरला राष्ट्रपतींच्या हस्ते ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’, नदीत वाहणाऱ्या महिलेचे वाचवले होते प्राण

बीडच्या रोहन बहिरला राष्ट्रपतींच्या हस्ते ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’, नदीत वाहणाऱ्या महिलेचे वाचवले होते प्राण

Next

बीड: स्वत:च्या जीवाची पर्वा न करता नदीच्या पुरात वाहून जाणाऱ्या महिलेचे प्राण वाचविले. या साहसी शौर्याबद्दल बीड तालुक्यातील नवगण राजुरी येथील रोहन बहिर यास नवी दिल्ली येथे सोमवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. या पुरस्काराचे स्वरूप पदक, १ लाख रूपये रोख आणि प्रमाण पत्र असे आहे.

नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाच्यावतीने ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार २०२३’ पुरस्कार प्रदान कार्यक्रम पार पडला. पुरस्कार सोहळया प्रसंगी राष्ट्रपती, केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री स्मृती झुबिन इराणी, केंद्रीय महिला व बाल विकास राज्य मंत्री डॉ. मुंजपारा महेंद्रभाई, सचिव इंदिवर पांडे व्यासपीठावर उपस्थित होते. याप्रसंगी देशभरातील ११ बालकांना सहा विविध श्रेणींमध्ये त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारा’ने सोमवारी सन्मानित करण्यात आले. यामध्ये ६ मुले आणि ५ मुलींचा समावेश आहे.

रोहनने वाचविले होते प्राण
बीड तालुक्यातील राजुरी नवगण येथील रोहन बहिर याने गावातील डोंगरी नदीला आलेल्या पुरात पाय घसरून पडलेल्या महिलेला स्वत:च्या जीवाची पर्वा न करता मोठया साहसाने वाचविले. रोहनच्या समय सूचकतेमुळे त्या महिलेचे प्राण वाचले. त्याच्या या शौर्यासाठी प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Web Title: Rohan Bahir of Beed was awarded 'Prime Minister's National Child Award' by the President, for saving the life of a woman who was drowning in a river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.