काँग्रेस पक्षाची भूमिका मराठा आरक्षणाच्या बाजूनेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:35 AM2021-05-11T04:35:56+5:302021-05-11T04:35:56+5:30

: अनेकांना काँग्रेस समजलीच नसल्याने बेजबाबदार वक्तव्य केज : मराठा आरक्षण मिळावे, ही भूमिका काँग्रेस पक्षाची व नेतृत्वाची कायम ...

The role of the Congress party is on the side of Maratha reservation | काँग्रेस पक्षाची भूमिका मराठा आरक्षणाच्या बाजूनेच

काँग्रेस पक्षाची भूमिका मराठा आरक्षणाच्या बाजूनेच

Next

:

अनेकांना काँग्रेस समजलीच नसल्याने बेजबाबदार वक्तव्य

केज :

मराठा आरक्षण मिळावे, ही भूमिका काँग्रेस पक्षाची व नेतृत्वाची कायम आहे. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आदी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी याबाबत पक्षाची भूमिका जाहीर केलेली आहे व तीच भूमिका कायम असून, काहीजण मात्र पक्ष भूमिका बाजूला ठेवून विनाकारण समाजाच्या भावना भडकावत आहेत, अशा भूमिकेचे काँग्रेस पक्ष म्हणून कधीही समर्थन होणार नाही व आरक्षण मिळण्यासाठी काँग्रेसची भूमिका मागेही होती व पुढेही राहील, अस मत युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा केजचे माजी नगराध्यक्ष आदित्य पाटील यांनी म्हटले आहे.

काँग्रेस पक्ष हा समाजातील सर्व जाती-धर्मांना धरून चालणारा पक्ष आहे. १८ पगड जाती धर्मातील लोकांनी या पक्षात विविध पदांवर आजपर्यंत काम केल्याचा इतिहास असून, हा पक्ष कोण्या एका जातीधर्माचा नसून, सर्वधर्मसमभाव हे ब्रीद घेऊन चालणारा पक्ष आहे. पक्षाने मराठा आरक्षणाच्यासंदर्भात आपली भूमिका स्पष्टपणे बोलून व कृतीतून दाखवलेली आहे. काँग्रेसचे ज्येेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी ते मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा केलेला होता; परंतु नंतर राज्यात सत्तांतर झाले व पुढील सरकारने त्या निर्णयाची पूर्तता न केल्याने पुन्हा समाजाला मराठा आरक्षणाचा लढा लढावा लागत आहे; मात्र मराठा समाजाला आरक्षण हे मिळालेच पाहिजे, ही भूमिका राज्य सरकारने घेतली आहे व त्यादृष्टीने सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचे आदित्य पाटील यांनी म्हटले आहे.

Web Title: The role of the Congress party is on the side of Maratha reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.