आठ आजोबांची सेवा करीत २४ वर्षांची कोमल निभावते आईची भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:35 AM2021-05-07T04:35:09+5:302021-05-07T04:35:09+5:30

भरविते घास शिरूर कासार : ज्यांना घरचे मुलं सांभाळत नाही ,ज्यांना मूल बाळच नाही किंवा काही रस्त्यावरच आपले ...

The role of a gentle mother of 24 years serving eight grandparents | आठ आजोबांची सेवा करीत २४ वर्षांची कोमल निभावते आईची भूमिका

आठ आजोबांची सेवा करीत २४ वर्षांची कोमल निभावते आईची भूमिका

Next

भरविते घास

शिरूर कासार : ज्यांना घरचे मुलं सांभाळत नाही ,ज्यांना मूल बाळच नाही किंवा काही रस्त्यावरच आपले जीवन कंठत असणा-या निराधार निराश्रितांची सेवा करण्यासाठी राक्षसभुवन येथे आजोळ परिवार ही संस्था सुरू झाली. पाहता पाहता या ठिकाणी आठ नऊ वयोवृध्द आश्रयाला आले. त्यात जवळपास काहीनी वयाची ऐंशी गाठलेली, तोंडातील दंतपक्तिींनीह साथ सोडलेली. कानाचे पडदे निकामी झालेले अशा अवस्थेत असणा-या आठ वयस्कर आजोबांची सेवा सुश्रूषा करत त्यांना वेळप्रसंगी आपल्या हाताने घास भरवुन कोमल तांबे ही २४ वर्षीय मुलगी आईची भूमिका निभावत आहे.

दोन वर्षापूर्वी कर्ण तांबे या तरूणाने सेवाधर्म स्विकारत आपले आयुष्य निराधार निराश्रितांना कामी यावे यासाठी आजोळ परिवार ही संस्था सुरू केली. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत त्याने हा निर्णय धाडसाने घेतला आणि निभावलादेखील. यात त्यांची धर्मपत्नी कोमल तांबे हीचा मोलाचा वाटा लाभला. कोमलचा विवाह कर्ण तांबे यांचे बरोबर झाला आणि तेव्हापासुन अर्धांगिणी म्हणून बरोबरीने साथ देत आहे. ,यांना तीन वर्षांचा एक मुलगा आहे. कोमलचे शिक्षणाचे बी. ए. द्वितीय वर्ष चालू आहे. शैक्षणिक ,मुलाची आई त्याचबरोबर आजोळात आश्रित असलेल्या आठ वयस्कर आजोबांची सेवा कोमल करीत आहे.

आजोळात एकनाथ औसरमल (७६),शांताराम झरकर (८०) दिव्यांग ,लक्ष्मण ढाकणे (७८),दादा (४५) याचे गाव आणि नावही माहित नसून तो मतीमंद ,मूक आहे. लक्ष्मण चौरे (६९) व सरस्वती मिसाळ असे आश्रित आहेत. या सर्वांची देखभाल कोमल अगदी स्वत:च्या लेकराप्रमाणे करते वेळप्रसंगी त्यांना घास देखील भरवते.

हे आमचेच घर वाटते

आमच्या मुलांनी व सुनांनी देखील एवढी काळजी घेतली नसती, इतकी काळजी हे दोघे घेत असल्याने आम्हाला आता हे आमचेच घर असल्याचे वाटते असे ८० वर्षीय शांताराम झरकर यांनी सांगितले .मी रस्त्यावर फरफटत होतो ,यांनी आणले नसते तर मी केव्हाच जगाचा निरोप घेतला असता असे सांगताना झरकर यांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या.

घेतला वसा टाकणार नाही

घेतलेला वसा टाकणार नाही ,शिक्षीत म्हणवणारे परंतू आई वडीलांचा सांभाळ करण्यात रस नसल्याने वृध्दाश्रम सुरू आहे. आपल्या संस्कृतीत बसत नाही परंतू अशांनाही मायेचा ओलावा दिल्यास त्यांच्यातच परमेश्वर दर्शन झाल्याचा आनंद मिळतो, असे कर्ण तांबे यांनी सांगितले. या कामात माझे आई, वडील आणि धर्मपत्नी कोमलचा मोठा वाटा असल्याचे सांगितले. आता घरगुती आनंदाचे क्षण साजरे करण्यासाठी मदतीच्या भावनेतून अनेकजन आजोळात येत असून मदतीचे हात पुढे करत असल्याने त्यांच्याबाबत कृतज्ञता कर्ण व कोमल तांबे यांनी व्यक्त केली.

Web Title: The role of a gentle mother of 24 years serving eight grandparents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.