प्रमुख नेत्यांनी घेतली व्यासपीठासमोर बसण्याची भूमिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:27 AM2021-01-15T04:27:48+5:302021-01-15T04:27:48+5:30
परळी : तालुक्यातील पौळ पिंपरी येथे जिजाऊ जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. दिनांक १२ जानेवारी रोजी गावाच्या मुख्य ...
परळी : तालुक्यातील पौळ पिंपरी येथे जिजाऊ जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. दिनांक १२ जानेवारी रोजी गावाच्या मुख्य चौकातील राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. त्याचबरोबर गावच्या सरपंच शामल माणिकराव पौळ यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे प्रतीक भगव्या पताकेने ध्वजारोहण व जिजाऊ वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून दत्तात्रय काळे, चेअरमन विठ्ठलराव पौळ यांच्यासह अंगणवाडी सेविका व आशा सेविका उपस्थित होत्या. विशेष म्हणजे प्रमुख नेत्यांनी व्यासपीठासमोर बसण्याची भूमिका घेऊन जिजाऊ जयंतीला विशेष अतिथी म्हणून गावातील महिलांना मानाचे स्थान दिले. बालव्याख्याती वैष्णवी दत्तात्रय साबळे हिने राजमाता जिजाऊंचा इतिहास सर्वांसमोर मांडला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण पौळ, माणिकराव पौळ यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला. प्रास्ताविक विचारवंत लक्ष्मण वैराळ यांनी केले. प्रा. दत्तात्रय मोरे यांनी सूत्रसंचलान केले.
ज्येष्ठ नेते बबन पौळ यांनी आभार मानले. ग्रामपंचायत सदस्य दादा आवटे, रूस्तुम माने, दादासाहेब डिकले, बिबीशन जाधव, विष्णू काळे, राजाभाऊ कोल्हे, हनुमान पौळ, अजित पौळ, सिद्धेश्वर दळवी, राजश्री कुलकर्णी, बिबन शेख आदींची कार्यक्रमास उपस्थिती होती.