रोटरी क्लबच्या वतीने २१ निराधार महिलांना शिलाई यंत्रांचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:38 AM2021-08-20T04:38:19+5:302021-08-20T04:38:19+5:30
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी योगेश्वरी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. शिवाजीराव कऱ्हाड, विशेष अतिथी अक्षय मुंदडा हे होते. तर, प्रमुख अतिथी ...
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी योगेश्वरी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. शिवाजीराव कऱ्हाड, विशेष अतिथी अक्षय मुंदडा हे होते. तर, प्रमुख अतिथी म्हणून स्वाराती रुग्णालयाचे मेडिसिन विभागप्रमुख डॉ. सिद्धेश्वर बिराजदार, मानवलोकचे कार्यवाह अनिकेत लोहिया, नंदकिशोर रांदड, तुषार मोरे, डॉ. सुरेश अरसुडे, अनंत लोमटे, अंगद कऱ्हाड उपस्थित होते.
कोरोनामुळे निराधार झालेल्या या कुटुंबांतील महिलांना मणियार यांच्यामार्फत शिवणकामाचे प्रशिक्षण देऊन त्यांना शिलाई मशीन देण्यात आली. त्यांची उपजीविका सुस्थितीत चालविण्यासाठी रोटरीने हा उपक्रम हाती घेतला आहे. तसेच कोरोनाच्या काळात रुग्णसेवा सुस्थितीत चालण्यासाठी डॉ. नवनाथ घुगे यांच्या रुग्णालयास ५ लीटर क्षमतेचे २ ऑक्सिजन कॉनस्ट्रेटर यंत्र देण्यात आले.
रोटरी सदस्य डॉ. निशिकांत पाचेगावकर व कल्याण काळे यांनी सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव काळे, बाबू खडकभावी, डॉ. सिद्धेश्वर बिराजदार, नंदकिशोर रांदड, तुषार राजू मोरे या दानशूर व्यक्तींकडून या मशीन उपलब्ध केल्या होत्या. त्या मशीनचे वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमासाठी रोटरी अध्यक्ष विवेक गंगणे, सचिव रोहिणी पाठक यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी संतोष मोहिते, धनराज सोळंकी, प्रदीप झरकर, अनिरुद्ध चौसाळकर, शेख मोईन, नरेंद्र ठाकूर, सचिन बेंबडे, डॉ. अनिल केंद्रे, गोपाळ पारीख, भीमाशंकर शिंदे, स्वप्नील परदेशी, डॉ. बाळासाहेब लोमटे, संजीव गौड, सुभाष पाचेगावकर, सिद्रामअप्पा बनाळे, अतुल जाधव, प्रा. रमण सोनवळकर, सुदर्शन रापतवर उपस्थित होते.
190821\img-20210816-wa0042.jpg
शिलाई मशीन चे वाटप करण्यात आले