हरभरा, तुरीचे थकलेले १३ कोटी रुपये मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 12:02 AM2018-11-13T00:02:30+5:302018-11-13T00:03:16+5:30
जिल्ह्यात दुष्काळाच्या दाहकतेची तीव्रता वाढली असून, पाणी, चारा आणि मजुरांच्या हाताला काम, अशा विविध प्रश्नांवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दुष्काळी आढावा बैठकीत विविध मागण्यांचे निवेदन आ.जयदत्त क्षीरसागर यांनी दिले. या मागण्यांना मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्यात दुष्काळाच्या दाहकतेची तीव्रता वाढली असून, पाणी, चारा आणि मजुरांच्या हाताला काम, अशा विविध प्रश्नांवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दुष्काळी आढावा बैठकीत विविध मागण्यांचे निवेदन आ.जयदत्त क्षीरसागर यांनी दिले. या मागण्यांना मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली असून दुष्काळाबाबत शासनाने तातडीने उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे हरभरा व तुरीचे १३ कोटी रुपये मंजूर झाले असून ते तातडीने शेतकºयांना येत्या चार दिवसांत मिळतील, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे आ.क्षीरसागर यांनी सांगितले.
सिंचन प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात विहिरी घेऊन त्यावर तात्पुरती पाणी पुरवठा योजना मंजूर करावी, ही मागणी मुख्यमंत्र्यांनी गांभिर्याने घेत तातडीने व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सचिवांशी बोलून विभागीय आयुक्तांना याबाबतच्या डिजाईन आणि अंदाजपत्रक तयार करण्याचे आदेश दिले. जिल्ह्यात जलयुक्त शिवारचा निधी दुप्पट करावा, राशन दुकानातून सवलतीच्या दरात अन्न धान्य उपलब्ध करून देऊन भूमिहीन शेतकरी, शेतमजूर यांना माणसी २० किलो गहू व १५ किलो तांदूळ देण्यात यावा, या मागणीला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक होकार देऊन त्यास मंजुरी दिली. जिल्ह्यात एम.आर.ई.जी.एस. अंतर्गत शेतकºयांसाठी देण्यात येणाºया विहिरी इष्टांक वाढवून देण्यात याव्यात. ज्या प्रकल्पात पाणीसाठा आहे ते पाणी पिण्यासाठी आरक्षीत करून पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्यात यावे, जुन्या रोहयो नुसार कामे चालू करावीत, तातडीने छावण्या उघडून किंवा दावणीला चारा उपलब्ध करून द्यावा. दुधाला ५ रुपये दरवाढ करण्यात आली होती ही मुदत आता संपत असून ही दरवाढ पुढेही चालू ठेवावी. राज्यातील दुष्काळी भागात इफको व गोदरेज कंपन्यांकडून पशुखाद्य उपलब्ध करून द्यावे. गतवर्षी खरेदी केलेल्या हरभरा व तुरीचे थकित १३ कोटी रुपये तातडीने द्यावेत, अशी मागणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हे पैसे वर्ग करण्यात येतील असे सांगितले. मराठवाड्यात गोदावरी खोºयात २५० सिंचन प्रकल्पाला मंजुरी देण्याची मागणीही आ.क्षीरसागर यांनी केली आहे. याबाबत तातडीने सर्वेक्षण करून प्रस्ताव शासनाकडे पाठवण्याचे आदेश देण्यात आले. सिंदफना, कुंडलिका, मांजरा, वाण व मनार या नदीच्या खोºयात कायमस्वरूपी शास्वत पाणी मिळावे, यासाठी सर्वेक्षणाकरीता २० कोटीची तरतूद करावी व बीड, गेवराई, माजलगाव शहराला पिण्याचे पाणी मिळावे यासाठी जायकवाडी प्रकल्पातून 3 टीएमसी पाणी माजलगाव धरणात सोडण्यात यावे. सध्या बीड शहरात अमृत अटलचे काम प्रगतीपथावर असून या कामासाठी लागणारा निधी उपलब्ध करावा अशी मागणी केली असता या कामासाठी निधीची कमतरता पडणार नाही असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.