गतिरोधकावरील रबर गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:29 AM2021-02-15T04:29:58+5:302021-02-15T04:29:58+5:30
बीड : शहरातून जाणाऱ्या भरधाव वाहनांवर नियंत्रण रहावे यासाठी अनेक ठिकाणी रबरी गतिरोधक बसवण्यात आले. मात्र, या गतिरोधकावरील हे ...
बीड : शहरातून जाणाऱ्या भरधाव वाहनांवर नियंत्रण रहावे यासाठी अनेक ठिकाणी रबरी गतिरोधक बसवण्यात आले. मात्र, या गतिरोधकावरील हे रबर काही ठिकाणी गायब असल्याचे दिसून येत आहे. तसेच काही ठिकाणी याची दुरवस्था झाल्याचे दिसून येत आहे. संबंधित यंत्रणेने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
कुंड्यातील कचऱ्यास आग लावण्याचे प्रकार
बीड : शहरातील सहयोगनगर भागामध्ये कचराकुंडीत टाकलेल्या कचऱ्यास परिसरातील नागरिकांकडून आग लावून देण्याचे प्रकार घडत आहेत. यामुळे परिसरात धूरसदृश्य स्थिती निर्माण होत आहे. पर्यावरणाचेही नुकसान होत आहे.
धुळीचे प्रमाण वाढल्याने त्रस्त
बीड : शहरातील अंबिका चौकातून पिंपळनेरकडे जाणाऱ्या मार्गावर धुळीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. मोठे वाहन गेल्यानंतर त्यांच्या मागे असलेल्या वाहनांना धुळीमुळे समोरचे काही दिसत नसल्याने त्रास होत आहे.