सोशल मीडियावर अफवा; पोलिसांकडून कारवाई सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 12:18 AM2019-03-31T00:18:41+5:302019-03-31T00:19:04+5:30

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आणि कायदा व सुव्यवस्थेला बाधा ठरणाऱ्या आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावरून व्हायरल करणाऱ्यांवर बीड पोलिसांनी कारवायांचा बडगा उगारला आहे.

Rumors on social media; The police took action | सोशल मीडियावर अफवा; पोलिसांकडून कारवाई सुरु

सोशल मीडियावर अफवा; पोलिसांकडून कारवाई सुरु

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आणि कायदा व सुव्यवस्थेला बाधा ठरणाऱ्या आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावरून व्हायरल करणाऱ्यांवर बीड पोलिसांनी कारवायांचा बडगा उगारला आहे. अवघ्या १२ तासांत १० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली असून आणखी ५० च्यावर लोकांची यादी तयार केली असून त्यांच्यावरही कारवाई केली जाणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात भाजप, काँग्रेस कार्यकर्त्यांत वाद झाला होता. या घटनेत अनेकांनी वादग्रस्त पोस्ट टाकल्या. तसेच शुक्रवारी केज तालुक्यातील धर्माळा येथे लोकसभा निवडणूक उमेदवाराच्या पत्नीवर कोयत्याने हल्ला झाल्याची अफवा पसरवली. याचे पडसाद जिल्ह्यात उमटले. सोशल मीडियावरून टीका व अपशब्द वापरून खालच्या स्तराचे राजकारण झाले. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
हाच धागा पकडून पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी सोशल मीडियावर अफवा पसरविणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी सायबर सेलमध्ये विशेष विभाग स्थापन केला. ७०३०००८१०० या क्रमांकावर आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यासंदर्भात आवाहन केले.
नाव गोपनीय ठेवण्याची हमी दिली. त्यामुळे अवघ्या १२ तासांत तक्रारींचा ढिगारा साचला. अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपअधीक्षक रोशन पंडित स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे यांनी आलेल्या तक्रारींची शहानिशा केली.
पोस्ट टाकणा-यांचा पत्ता आणि संपर्क क्रमांक मिळविले.
या सर्वांवर प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या.
पत्ता शोधताना दमछाक
सोशल मीडियावर पोस्ट टाकल्याचे दिसून येते. मात्र संबंधिताचा शोध घेऊन त्याच्याशी संपर्क करताना पोलिसांना कसरत करावी लागत आहे. विशेष पथक यासाठी काम करू लागले आहे. शोध घेऊन त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाया केल्या जात आहेत.

Web Title: Rumors on social media; The police took action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.