खून खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:25 AM2021-05-28T04:25:02+5:302021-05-28T04:25:02+5:30

शिरूर कासार : शहरातील तरुण सराफ व्यापारी विशाल कुलथे यांची अतिशय क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे. या प्रकारामुळे ...

Run a murder trial in a fasttrack court | खून खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवा

खून खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवा

Next

शिरूर कासार : शहरातील तरुण सराफ व्यापारी विशाल कुलथे यांची अतिशय क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे. या प्रकारामुळे व्यापारी वर्गात खळबळ उडाली असून सराफ व्यापाऱ्यांसह इतर सर्व व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. हा खून खटला फास्टट्रॅक कोर्टात चालविण्याची मागणी शिरूर तालुका व्यापारी संघाच्या वतीने करण्यात आली. गुरूवारी पोलीस उपनिरीक्षक डॉ. रामचंद्र पवार यांना मागण्यांचे निवेदन दिले.

शिरूरच्या आजपर्यंतच्या इतिहासात असा काळा दिवस कधीच उगवला नव्हता. शहरातील व्यापारी हे आपापल्या पद्धतीने त्यांचा व्यवसाय करून उपजीविका भागवत असून त्यांच्याविरुद्ध ग्राहकांची किंवा इतर कोणत्याही व्यक्तीची एकही साधी तक्रार आतापर्यंत कुठेही दाखल झालेली नाही. तालुक्यातील सर्व जातीधर्माचे व्यापारी शहरात आपला व्यवसाय करून प्रपंच चालवत तालुक्याच्या विकासात सहभागी होत. अशा परिस्थितीत व्यवसायाच्या नावाखाली दोन-चार वर्षांपूर्वी अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव येथून आलेल्या ज्ञानेश्वर गायकवाड याने सोने खरेदीचा बहाणा करून सराफ व्यावसायिक विशाल कुलथे यांना आपल्या हेअर सलूनमध्ये बोलावून घेत धीरज मांडकर आणि केतन लोमटे यांच्या मदतीने निर्दयीपणे खून केला. अगोदरच लॉकडाऊनचा काळ सुरू असताना त्यातच असा प्रकार घडल्यामुळे व्यापारी प्रचंड तणावाखाली आलेले आहेत. त्यामुळे सराफ व्यापारी विशाल कुलथे खून खटला प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी व्यापारी संघाचे अध्यक्ष बबनराव ढाकणे यांच्यासह उपाध्यक्ष तुकाराम काळे,सचिव अजिनाथ सूर्यवंशी,किरण देसारडा,महेश डोंगरे,प्रवीण कापरे,राजू खामकर,माउली काटकर,दिगांबर भांडेकर,हनुमान जाधव,अनवर पठाण,अमर माळी,महेश उटे,मोहन गायकवाड आदी उपस्थित होते.

===Photopath===

270521\vijaykumar gadekar_img-20210527-wa0038_14.jpg

Web Title: Run a murder trial in a fasttrack court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.