धावाधावा...पळापळा...भररस्त्यात रेड्यांच्या टक्करीने लोकांची धांदल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2021 06:35 PM2021-11-29T18:35:09+5:302021-11-29T18:36:11+5:30

शहरातील बसस्थानकामागील छत्रपती शाहू महाराज मार्गावरुन शाहूनगरकडे जाणाऱ्या ऐन चौकात खासगी व्यक्तींच्या मालकीचे दोन रेडे समोरासमोर आले.

Run ... Run ... People rush to the spot due to the collision of buffaloes ! | धावाधावा...पळापळा...भररस्त्यात रेड्यांच्या टक्करीने लोकांची धांदल !

धावाधावा...पळापळा...भररस्त्यात रेड्यांच्या टक्करीने लोकांची धांदल !

googlenewsNext

बीड: शहरातील शाहूनगर भागात ऐन चौकात दोन रेड्यांमध्ये जुंपली. तब्बल अर्धा तास ही झुंज सुरु होती. त्यामुळे वाहतूक तर ठप्प झालीच, पण धावाधावा व पळापळाच्या हाकेने बघ्यांचीही धांदल उडाली. दोन्ही रेड्यांच्या पायाला दोर बांधून त्यांना दोन वेगवेगळ्या दिशेला नेले तेव्हा ही टक्कर थांबली. २९ नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता हा प्रकार घडला.

शहरातील बसस्थानकामागील छत्रपती शाहू महाराज मार्गावरुन शाहूनगरकडे जाणाऱ्या ऐन चौकात खासगी व्यक्तींच्या मालकीचे दोन रेडे समोरासमोर आले. प्रत्यक्षदर्क्षींच्या मते त्यांनी एकमेकांकडे रोखून पाहिले व धावतच समोरासमोर आले. त्यानंतर एकमेकांना शिंगाने मारुन टक्कर सुरु झाली. दोन्ही रेड्यांची शिंगे एकमेकांत अडकल्याने त्यांच्या शरीराचा तोल जात होता. मात्र, हा तोल सांभाळत त्यांची झुंज सुरु होती. पाहता- पाहता ते अधिक आक्रमक झाले. त्यामुळे दोन्ही बाजूची वाहने खोळंबली. भररस्त्यात त्यांची ही झुंज सुरु असल्याने बघ्यांची गर्दीही वाढली. कधी रस्त्याच्या या बाजूला तर कधी त्या बाजूला असा त्यांचा मुक्त 'धिंगाणा' सुरु होता. तब्बल अर्धा तास हा सगळा प्रकार सुरु होता. त्यामुळे पादचाऱ्यांसह दुचाकीस्वारांना रस्त्यात अडकून पडावे लागले.काही जणांनी मोबाइलमध्ये चित्रीकरण करुन मनोरंजन केले.

दुचाकी कोसळल्या
रेड्यांच्या झुंजीदरम्यान धक्का लागून ओळीने उभ्या केलेल्या तीन दुचाकी पडल्या, त्यानंतर एक रेडा नालीत कोसळला. मात्र, त्याने वर येऊन समोरच्या रेड्यावर शिंगाने हल्ला केला. काही व्यापाऱ्रूांनी भीतीने दुकाने बंद केली.

पोलीस आले अन् गेले !
या झुंजीदरम्यान शिवाजीनगर ठाण्याचे पोलीस तेथे पोहोचले. एरवी भांडणात दोन्ही गटांना शांत करणारे पोलीस रेड्यांच्या टकरीत काहीच करु शकले नाहीत. दोन्ही रेड्यांचे आक्रमक रुप पाहून पोलिसांनी जमावाला मागे सरकरण्याचा सल्ला देत तेथून निघून जाणे पसंद केले.

पायात दोर टाकून मिळवले नियंत्रण
दोन्ही रेडे एकमेकांवर चवताळून पडत. शिंगे लागल्याने ते जखमी झाले व रक्त निघू लागले. काठीने मारुन, शेपटी पिरगळून रेड्यांवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न असफल झाल्याने अखर दोन्ही रेड्यांच्या पायांना दोरीने बांधून त्यांना एकमेकांपासून वेगळे केले. याउपरही एका रेड्याने पुन्हा दुसऱ्या रेड्याकडे नजर रोखून पाहत धावण्याचा प्रयत्न केला तेव्हा पुन्हा उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला.

Web Title: Run ... Run ... People rush to the spot due to the collision of buffaloes !

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.