रुटी इमनगाव तलाव ओव्हरफ्लो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:38 AM2021-09-12T04:38:48+5:302021-09-12T04:38:48+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क आष्टी : तालुक्यातील रुटी इमनगाव प्रकल्प पूर्णपणे भरला आहे. यामुळे आष्टी शहर व मुर्शदपूरच्या पिण्याच्या पाण्याचा ...

Ruti Imangaon lake overflow | रुटी इमनगाव तलाव ओव्हरफ्लो

रुटी इमनगाव तलाव ओव्हरफ्लो

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

आष्टी : तालुक्यातील रुटी इमनगाव प्रकल्प पूर्णपणे भरला आहे. यामुळे आष्टी शहर व मुर्शदपूरच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. शनिवारी या प्रकल्पाची पाहणी करून आ.सुरेश धस यांनी जलपूजन केले.

यावर्षी दमदार पावसामुळे आष्टी व मुर्शदपूर या दोन्ही शहरांसाठी पाणी पुरवठा करणारा रुटी इमनगाव येथील तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. यामुळे या दुष्काळी भागातील नागरिकांत समाधान व्यक्त केले जात आहे. मात्र, अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले आहे. अनेक वर्षांनंतर हा तलाव भरल्याने दोन्ही शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

या तलावाचे शुक्रवारी आमदार धस यांच्या हस्ते जलपूजन झाले. आष्टी व मुर्शदपूर शहाराला रूटी, इमनगाव या तलावांमधून आमदार सुरेश धस यांच्या प्रयत्नांतून राष्ट्रीय पेयजल योजना मंजूर करून पाइपलाइनद्वारे दोन्ही भागांमध्ये पाणी पुरवठा होत आहे. यावेळी भारत मुरकुटे, अशोक पवार, सचिन लोखंडे, गौतम आजबे, सागर धोंडे, नितीन मेहेर, गंगाराम गोल्हार, खंडू तोडकर, सुरेश वारंगुळे, गणेश शिंदे, मनोज सुरवसे, अजित घुले, दिपक निकाळजे, रियाज सय्यद, शरीफ शेख, अशोक मुळे, संतोष रणशिंग, कपिल अग्रवाल, राजेंद्र बन, संतोष धनवडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

110921\img-20210910-wa0566_14.jpg

रुटी इमनगाव तलाव ओव्हरफ्लो.सुरेश धस यांच्या हस्ते जलपूजन

Web Title: Ruti Imangaon lake overflow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.